AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : विमा दाव्याच्या रकमेने इंश्योरन्स कंपन्यांचे धाबे दणाणले, विमान प्रवास महागणार ? काय आहे प्रकरण ?

12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे 475 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे विमा दावे केले जाऊ शकतात, ही आता भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी विमा रक्कम आहे. यामुळे जागतिक विमान वाहतूक उद्योगाचे गणितच बदलणार आहे.

Plane Crash : विमा दाव्याच्या रकमेने इंश्योरन्स कंपन्यांचे धाबे दणाणले, विमान प्रवास महागणार ? काय आहे प्रकरण ?
| Updated on: Jun 20, 2025 | 8:45 PM
Share

भारतात एअर इंडियाच्या भीषण अपघाताने विमा कंपन्यांच्या जगताला वेगळे वळण लागण्याची चिन्हं आहेत. अहमदाबाद एअरपोर्टवर झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या विमान अपघातात २४१ प्रवासी तर अन्य मिळून २६० हून अधिक लोग दगावले आहेत. आता विमान प्रवाशांचा विमा दावा इतका मोठा आहे की त्याने ग्लोबल एव्हीएशन इंडस्ट्रीचे गणितच बदलले आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार या विमान दुर्घटनेतील विमा दावा सुमारे $475 दशलक्ष डॉलरपर्यंत (₹3940 कोटी रुपये) पोहचू शकतो. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एव्हीएशन इंश्योरेन्स क्लेम म्हटला जात आहे.

एकट्या विमानाची बॉडी आणि इंजिनचे नुकसान 125 दशलक्ष डॉलरचे आहे. तर प्रवाशांची जिवितहानी आणि अन्य नुकसान याची जबाबदारीचा संबंधीचा दावा अंदाजित 350 दशलक्ष डॉलर इतका आहे. भारतातील एव्हीएशन इंडस्ट्रीत साल 2023 रोजी जेवढा एकूण विमा प्रिमीयम जमा झाला होता.त्याहून ही रक्कम तीन पट जादा आहे. म्हणजे हा अपघात एअरलाईन्सच नाही तर संपूर्ण विमा सेक्टरची डोकेदुखी बनला आहे.

डोमेस्टीक विमा कंपन्यांनी त्यांचे 95% हून अधिक एव्हीएशन रिस्क आंतरराष्ट्रीय रीइंश्योरन्स कंपन्यांना ट्रान्सफर करुन ठेवले आहेत. याचा अर्थ खरी भरपाई तर विदेशी कंपन्यांना करावी लागणार आहे. आणि त्याच कंपन्या आता प्रीमीयमच्या अटी कठोर करायला जात आहेत असे जनरल इंश्योरेन्स कॉर्पोरेशनचे (GIC Re) चेअरमन रामास्वामी नारायणन यांनी म्हटले आहे.

परदेशी प्रवाशांच्या दाव्यांनी एकूण विमा रक्कम वाढणार

या अपघातात अनेक परदेशी नागरिक देखील होते. त्यांच्या वारसांना त्यांच्या देशातील कायद्यांतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे.त्यामुळे एकूण दाव्याची रक्कम वाढणार आहे.

प्रीमियम महागणार, एअरलाईन्सचा खिसा रिकामा

या अपघाताने भारतातील एव्हीएशन विमा पॉलीसीच्या प्रीमीयममध्ये मोठी वाढ होऊ शकते. खासकरुन पॉलीसी रिन्हूय होताना तर एअरलाईन्स कंपन्यांना मोठी तगडी रक्कम मोजावी लागणार आहे असे विमा क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

‘मेक इन इंडिया’ विमान, परंतू विदेशी कंपन्यांचे नुकसान

विमान आणि इंजिन भारतात बनवलेले होते., परंतू एअर इंडिया बोईंग ड्रीमलायनर  विमान अपघात विम्याचे ओझे मात्र परदेशी कंपन्यांच्या डोक्यावर पडणार आहे. यामुळे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील एव्हीएशन इंश्योरन्स सेक्टरवर परिणाम होणार असून प्रवास आणखी महाग होण्याची चिन्हं आहेत.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.