विमान कोसळल्यानंतर एअर इंडियाने दिली महत्वाची अपडेट, कंपनीने नेमकं काय म्हटलं? वाचा…

अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. टेकऑफनंतर काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं. यानंतर एअर इंडिय़ा कंपनीने या अपघाताबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

विमान कोसळल्यानंतर एअर इंडियाने दिली महत्वाची अपडेट, कंपनीने नेमकं काय म्हटलं? वाचा...
Plane crash
| Updated on: Jun 12, 2025 | 2:54 PM

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज मोठा विमान अपघात झाला झाला आहे. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटांमध्ये हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र काही जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर एअर इंडिय़ा कंपनीने या अपघाताबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

एअर इंडियाने दिली महत्वाची माहिती 

अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर एअर इंडियाने एक ट्वीट केले आहे. यात कंपनीने म्हटले की, “अहमदाबादवरुन लंडनलाा जाणाऱ्या AI171 या विमानाचा आज १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आहे. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू.

इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात असल्याची माहिती

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते अशी माहिती समोर आली आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आता या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुरतहून अहमदाबादला रवाना झाले आहेत.तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे अशी माहिती समोर आली आहे.