Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू

बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू
plane crash in kanpur
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 2:19 PM

पुण्याच्या बारामतीत काही आठवड्यांपूर्वी विमान कोसळल्याची घटना घडली होती. बारामतीमधील विमान दुर्घटनेची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमान प्रशिक्षक आणि शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला आहे. भारतातील वाढत्या विमान दुर्घटनेने प्रवाशांमध्ये भीती वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानातील पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाला आहे. विमानात बिघाड झाल्यानंतर विमान हे गंगा बॅरेजजवळ येऊन कोसळलं. विमान कोसळल्यानंतर अनेक तुकडे झाले. पोलिसांनी दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. नंतर दोघांचे मृतदेह हे पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. विमान हे डबल इंजिनचे असून 4 सीटर एअरक्राफ्ट होते. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं आहे.

विमान हे गर्ग एव्हिएशनचे होते. प्रशिक्षणादरम्यान विमान हे कानपूरच्या नाथा खेडा भागातील गंगा बॅरेजजवळ कोसळलं. या विमान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला घटनास्थळी उपस्थित बचाव पथकाने विमानच्या ढिगाऱ्यातून दोन गंभीर जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासाणीनंतर मृत घोषित केले.

 

कानपूरच्या ग्वालटोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रघुवीर लाल हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. विमान अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी बघ्यांची एक गर्दी झाली. काही वेळाने पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. शिकाऊ विमान गुरुवारी सकाळी 11.20 वाजता कानपूरच्या कँट क्षेत्रातून उड्डाण घेतलं होतं. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पुढील काही क्षणात कोसळलं. या विमान अपघातात कर्नाटकातील रहिवासी अभिषेक पुजारी आणि गुजरातचे सुमित भाटिया या दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही पायलटच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या अकाली मृत्यूने सहकारी हळहळ व्यक्त करत आहेत.

Follow Us