AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, बड्या नेत्याचं बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, शरीरावर जखमा आणि…

मुली आता खरंच कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. आता तर एका बड्या नेत्याने बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तो एवढ्यावर थांबला नाही तर...

धक्कादायक, बड्या नेत्याचं बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, शरीरावर जखमा आणि...
| Updated on: May 18, 2026 | 10:09 AM
Share

देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, नातेवाईकांकडे एवढंच नाही तर, घरात देखील मुली सुरक्षित नाहीत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. बड्या नेत्यानेच बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर देखील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय मुलीला गुंडांकडून धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी लुधियाना येथील रहिवासी आणि अकाली दल नेते जसकरणजीत सिंग देओल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांसोबत नेत्याची जुनी ओळख होती. फार पूर्वी पीडित मुलीचे कुटुंबिय आणि नेत्याची ओळख झालेली. पण या ओळखीची मुलीला मोठी किंमत मोजावी लागेल, असा वडिलांनी कधी विचार देखील केला नसेल. नेत्याने अनेकदा मुलीसोबत बळजबरी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या संपर्कात आल्यानंतर नेत्याचे मुलीच्या आईसोबत चांगले संबंध जुळून आले. त्यानंतर 2023 मध्ये मुलीच्या आईने नवऱ्याचं घर सोडून नेत्यासोबत राहण्यास सुरुवात केली.

वडिलांकडून गंभीर आरोप…

वडिलांनी असे आरोप केले आहेत की, आरोपीने मुलीला डेहराडूनमधील तिच्या बोर्डिंग स्कूलमधून मोहालीतील एका हॉटेलमध्ये नेले, जिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा मुलीने विरोध केला, तेव्हा आरोपीने, जर तिने कोणाला सांगितलं तर तिला आणि तिच्या आईला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने त्या अल्पवयीन मुलीचा पुन्हा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने विरोध केल्यानंतर नेत्याने तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. तक्रारीत असं देखील सांगण्यात आलं आहे की, मुलीला कालव्यात फेकण्याची आणि गुंडांकडून मारण्याची देखील धमकी दिली होती. त्या प्रसंगानंतर मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर मुलीने घडलेली सर्व घटना वडिलांना सांगितली.

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शारीरावर अनेक जखमा होत्या… चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेली सर्व घटना सांगितली… ज्यानंतर पोलिसांनी नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस आता अधिक चौकशी करत आहे. पण घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?