
भारताने मागच्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात स्वदेशी टेक्नोलॉजीच्या विकासात अभूतपूर्व प्रगती केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सारख्या संस्थांनी जागतिक स्तरावरची शस्त्रास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या शस्त्रास्त्रांनी फक्त भारताचीच सुरक्षा व्यवस्था मजबूत केली नाहीय, तर शेजारच्या पाकिस्तानसाठी सुद्धा ही शस्त्र धोकादायक बनली आहेत. तीन दिवस चालेल्या लढाईत पाकिस्तानची वाट लावणाऱ्या काही मेड इन इंडिया शस्त्रांबद्दल जाणून घेऊया.
आकाश
आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आकाश एअर डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे.
वैशिष्ट्य
रेंज : 45-70 किमी (आकाश-NG)
लक्ष्य : फाइटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाइल आणि बॅलेस्टिक मिसाइल्स
मार्गदर्शन : रडार-आधारित कमांड गाइडेंस आणि एक्टिव रडार होमिंग (आकाश-NG)
वॉरहेड : 60 किलोग्राम उच्च-विस्फोटक
अचूकता : 90-100% इंटरसेप्शन दर
तैनाती : मोबाइल लॉन्चर, टँक आणि ट्रकवर तैनात
इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर्स (ECCM) : शत्रुची जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप निष्क्रिय करण्यास सक्षम. स्वदेशीकरण : 96% अधिक स्वदेशी घटक, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’ प्रतीक.
तीन दिवसात आकाशने काय केलं?
9 मे रोजी पंजाबमध्ये डागण्यात आलेलं फतेह-1 मिसाइल आकाश-NG ने हवेतच नष्ट केलं. मिसाइल जसं आकाशच्या रेंजमध्ये (70 किमी) मध्ये आलं. त्याला ट्रॅक करुन इंटरसेप्ट करण्यात आलं.
ड्रोन स्वार्म्स: आकाशने DJI सैन्य ड्रोन आणि अन्य ड्रोन स्वार्म्सला निष्प्रभावी केल. जो श्रीनगर, बारामूला आणि भुज येथे हल्ल्याचा प्रयत्न करत होते. आकाशची ECCM क्षमता आणि रडार अचूकता महत्त्वपूर्ण आहे.
मिसाइल हल्ले : पंजाब आणि राजस्थानमध्ये PL-15 आणि AMRAAM मिसाइल्सला आकाशने हवेतच नष्ट केलं. आकाश मिसाइलच्या ग्राउंड सिस्टिमला अपग्रेड करण्यात आलं आहे. त्याशिवाय राडार, EOTS आणि टेलीमेट्री स्टेशन, मिसाइल ट्रॅजेक्टरी आणि फ्लाइट पॅरामीटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
ब्रह्मोस
सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइलची रेंज 290 किलोमीटर आहे. याच्या Advance वर्जनची रेंज 500 ते 800 किलोमीटर आहे. हे मिसाइल 200 ते 300 किलोग्रॅम हाय एक्सप्लोसिव म्हणजे स्फोटकं घेऊन जाण्यास सक्षम आहे. सोबतच हे मिसाइल शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन टार्गेट उद्धवस्त करण्यास सक्षम आहे. ब्रह्मोसद्वारे पाकिस्तानातील एअरबेस उडवण्यात आले.
स्काय स्ट्रायकर
स्काय स्ट्रायकर एक स्वायत्त लॉइटरिंग म्युनिशन (Kamikaze Drone) आहे. भारत आणि इस्रायलने संयुक्तरित्या हे ड्रोन विकसित केलय. हे ड्रोन आपली अचूकता आणि ‘लॉन्च एंड फॉरगेट’ टेक्नोलॉजीवर आधारित आहे.
लॉइटरिंग क्षमता: टार्गेट एरियामध्ये स्काय स्ट्रायकर बराचवेळ घिरट्या घालू शकतं. लक्ष्य हेरुन अचूकतेने हल्ला करता येतो.
पेलोड : हे 5 ते 10 किलोग्रॅम स्फोटक पेलोड वाहून नेऊ शकतं. छोट्या पण महत्त्वाच्या लक्ष्यांना नष्ट करण्यास प्रभावी आहे.
स्वायत्तता : हे ड्रोन स्वायत्तपणे लक्ष्याला ट्रॅक करुन नष्ट करु शकतं. ऑपरेटरने वारंवार या ड्रोनला नियंत्रित करण्याची आवश्यकता नाही.
रेंज आणि गती : याची रेंज आणि गती यामुळे हे ड्रोन शहरी आणि जटिल क्षेत्रात अधिक प्रभावी आहे.
7 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये स्काय स्ट्रायकर ड्रोनने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रडारला हे ड्रोन सापडत नाही. त्यामुळे ते अजून घातक आहे.