AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिहादसाठी बॉम्ब कशाला? हवा चाकू; ‘गजवा-ए-हिंद’ चा छुपा अजेंडा, अलकायदा महिला दहशतवाद्याच्या ATS ने आवळल्या मुसक्या

Shama Parveen Al-Queda : 'गजवा-ए-हिंद' साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली. बंगळुरू येथे ही कारवाई करण्यात आली. शमा परवीन ही अल-कायद्यासाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. काय आहे हे प्रकरण...

जिहादसाठी बॉम्ब कशाला? हवा चाकू; 'गजवा-ए-हिंद' चा छुपा अजेंडा, अलकायदा महिला दहशतवाद्याच्या ATS ने आवळल्या मुसक्या
'गजवा-ए-हिंद' चा छुपा अजेंडा
| Updated on: Jul 30, 2025 | 12:14 PM
Share

‘गजवा-ए-हिंद’ साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली. बंगळुरुमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. 30 वर्षीय शमा परवीन ही गेल्या काही दिवसांपासून एका खास मिशनवर काम करत होती. तिच्या साथीदारांना एटीएसने यापूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून उचलले होते. 3 दहशतवाद्यांना अटक केली होती. शमी परवीन ही त्यातील पुढील कडी होती. तिच्या अटकेमुळे दख्खनमध्ये अल कायदा तरुणांचे ब्रेन वॉश करत असल्याचे समोर आले आहे.

अल-कायद्याचे इंडियन मॉड्यूल

गुजरात एटीएसने अल-कायदाचे इंडियन मॉड्यूल समोर आणले. त्यात शमा परवीन हिला बंगळुरू येथून अटक केली आहे. ती या मॉड्यूलची मास्टरमाईंड मानण्यात येत आहे. एटीएसने 23 जुले रोजी अल कायद्याशी संबंधीत चार दहशतवाद्यांना देशातील विविध भागातून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून शमाचे नाव वारंवार समोर येत होते. शमा परवीनचे नाव समोर आल्यावर तिला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सात दिवसानंतर कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू येथून अटक केली. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पकडण्यात आलेली महिला ही पाकिस्तानच्या थेट संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ही महिला समाज माध्यमावर सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

‘गजवा-ए-हिंद’ चा प्रसार

गुजरात एटीएसने केलेल्या खुलाश्यानुसार, त्यांनी मोठ्या दहशतवादी प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी हे इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ‘गजवा-ए-हिंद’ चा प्रसार करत असल्याचे समोर आले आहे. भारतातील तरुणांची माथी भडकवण्याचे आणि त्यांना अल कायद्याच्या प्रवाहात ओढण्याचे काम परवीन करत होती. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जिहादी विचार पसरवण्यासाठी 5 इन्स्टाग्राम खाती परवीन चालवत होती. त्यात ती तरुणांना जिहादी विचारासाठी प्रवृत्त करत होती. जिहादसाठी बॉम्बची नाही तर केवळ एका चाकूचीच गरज आहे, असे जहाल विचार ती पसरवत होती. तिच्या इन्स्टाग्राम खात्यांची एटीएस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत किती तरूण तिच्या संपर्कात आले, याचा पण तपास होण्याची शक्यता आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा