महाशक्तीशाली भूकंपाचा पहिला Video समोर, घरं पडताहेत, कार आणि माणसं, अनेकांच्या काळजाचा थरकाप
Powerful Earthquake and Tsunami Alert : रशियातील कामचटका या द्वीप समूहाजवळ 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा हादरा बसला. त्याचे भयावह व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही.

Russia powerful earthquake : रशियातील कामचटका या द्वीप समूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाशक्तीशाली भूकंप आला. या भूकंपाने समुद्रात लाटा उसळल्या. तर अनेक घरं पडली. झाडं उन्मळली. एका व्हिडिओत कार एखाद्या झोपाळ्यासारख्या हालताना दिसल्या. माणसं सैरभैर पळताना दिसली. खवळलेल्या समुद्राचे रौद्र रुप पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्सुनामीचा अलर्ट मिळताच नागरिकांमध्ये दहशत पसरली. भूकंप आणि त्सुनामीचा प्रभाव पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला सतर्कतेचा, सावधानतेचा इशारा दिला.
वाहनतळावरील कार जणून झोपाळ्यात
हा भूकंप इतका खतरनाक होता की, पार्किंगमधील उभ्या कार जणू एखाद्या झोपाळ्यात असल्यासारख्या हेलकावे खात होत्या. त्याचा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. तो व्हिडिओ पाहताच तुम्हाला पण भूकंपाची तीव्रता जाणवेल.
Video shows just how STRONG underground TREMORS got
Cars start MOVING like crazy pic.twitter.com/dLHeLuGBpg
— RT (@RT_com) July 30, 2025
भूकंपाचे भीतीदायक व्हिडिओ
जापानने दिलेल्या माहितीनुसार, हा भयावह भूकंप रशियाच्या कामटका या द्वीपाजवळ आला. या महाभूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडिओतून त्याची तीव्रता आणि निसर्गाचे रौद्ररूप दिसून येते.
❗️Underground TREMORS shook the coast of Avacha Bay after a STRONG 8.7M QUAKE
Tsunami threat in Kamchatka continues
Residents being EVACUATED https://t.co/PHmWoI73KO pic.twitter.com/pQ8xPpSCi2
— RT (@RT_com) July 30, 2025
ट्रम्प सुद्धा घाबरले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून घाबरले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अलास्का आणि अमेरिकेच्या प्रशांत महासागराच्या किनारपट्टीवर त्सुनामीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. जापान पण याच पट्ट्यात आहे. या भूकंपामुळे प्रशांत महासागराच्या अनेक भागांना त्सुनामीचा तडाखा बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. खासकरून अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रांसाठी आणि जपानसाठी त्यांनी सावधानतेचा इशारा दिला. सोबतच हवाई बेटांना पण अलर्ट राहण्याचे संकेत दिले. त्यांनी जपानसह प्रशांत महासागरातील अनेक भागांना त्सुनामीचा तडाखा बसण्याचे संकेत दिले आहेत. या भागांमधील नागरिकांनी सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
रूस के सुदूर पूर्वी क्षेत्र कामचटका प्रायद्वीप में 8.7 तीव्रता का शक्तिशाली भूकंप, अमेरिका से जापान तक सुनामी की चेतावनी जारी#earthquake #tsunami #Russia #Japan #Hawaii #Alaska pic.twitter.com/4SyMnhKMPe
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) July 30, 2025
त्सुनामीच्या लाटा कुठे?
रशियाचे कुरील द्वीप आणि जापानमधील उत्तर भागातील मोठे होक्काइडो या द्वीपसमूहाच्या किनारपट्टीला त्सुनामीचा धोका आहे. बुधवारी भल्या पहाटे या भागातच 8.8 तीव्रतेच्या भूकंपाने धोक्याची घंटा वाजवली. होनोलूलूमध्ये मंगळवारी त्सुनामी इशाऱ्याचे भोंगे दिवसभर वाजत होते. लोकांना उंच ठिकाणी जाण्यासाठी सांगण्यात आले. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, जवळपास 30 सेंटीमीटर उंचीची पहिली त्सुनामीची लाट होक्काइडोच्या किनाऱ्यावर धडकली. या लाटा सामान्य लाटांइतक्या जाणवत असल्या तरी त्यांचा दबाव, जोर अधिक आहे.
