E20 मुळे नुकसानीच्या तक्रारी, सरकार हे नवं पेट्रोल आणण्याच्या तयारीत
E20 पेट्रोलला जोरदार विरोध होत आहे. अनेकांनी याविरोधात मोर्चा उघडला. त्यामध्येच आता सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी केली जात आहे. जुन्या वाहनांसाठी सरकारकडून E10 पेट्रोल उपलब्ध करून दिले जाऊ शकते.

देशभरात E20 पेट्रोलची जोरदार चर्चा आहे. त्यावरून विविध आरोप सातत्याने केली जात आहेत. काही लोक E20 पेट्रोलचा विरोध करत आहेत. काहींकडून त्याचे समर्थन केले जात आहे. नितीन गडकरी E20 पेट्रोलसाठी आग्रही आहेत. ग्राहकांची अशी तक्रार आहे की, या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते आणि इंजिनच्या भागांचे नुकसान होते. मात्र, सरकारकडून हा दावा खोडून काढला जात आहे. जे जुनी वाहने आहेत, त्यांना E20 पेट्रोल समजणार नाही, त्यात काही समस्या येत असल्याचे सांगितले जातंय. जुन्या वाहनांसाठी सरकारकडून E10 पेट्रोल आणण्याची तयारी केली जात आहे. आता फक्त E20 नाही तर E10 पेट्रोलही सरकारकडून आणले जात आहे. सरकारकडून यावरून चर्चा केल्या जात आहेत. जुन्या गाड्यांसाठी E20 पेट्रोल असणार आहे.
सरकारकडून या इंधनाचे फायदे वारंवार सांगितली जात आहेत. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन मार्ग खुला होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि तेल उद्योग यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. बाजारात E20 पेट्रोलसोबतच E10 पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे का, यावर विचार-विनिमय सुरू आहे. लवकरच याबाबत थेटपणे निर्णय होऊ शकतो.
E20 वर होणाऱ्या आरोपांवर सरकारने हा मार्ग काढला. सध्या प्राथमिक चर्चा सुरू असून काही निर्णय घेण्यात आला नाही. भारताने गेल्या वर्षी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले. हे उद्दिष्ट पाच वर्ष अगोदरच साध्य केले. मात्र, जुन्या वाहनांच्या मुद्द्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सरकारकडून बेस्ट फ्यूल म्हणून E20 पेट्रोलला पुढे केले जातंय.
काही लोक दावा करत आहेत की, E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांना समस्या येत आहेत. जुने इंजन इथेनॉलनुसार, डिझाईन करण्यात आले नाही. ज्यामुळे मायलेजवर परिणाम होत आहे. काही गाड्यांच्या इंजनवर त्याचा परिणाम होत आहे. सरकार सतत यावर काम करत आहे. सरकारने संसदेत म्हटले की, जुन्या वाहनांनी E20 पेट्रोल वापरल्याने मायलेज 3 ते 6 टक्के कमी होत आहे.
यासोबतच जुन्या वाहनांच्या रबर कंपोनेटवरही परिणाम होत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, E20 पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होईल. यात आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वाहनमालकांना पेट्रोल निवडण्याचा अधिकार का दिला जात नाही. जर एखाद्या चालकाला E10 वापरायचे असेल तर त्याला जुन्या गाडीच्या E10 प्रमाणपत्र द्यावे लागेल. E10 साठी आता सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत.