मोठी बातमी! अमेरिकेचा भारताला सर्वात मोठा धक्का, ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनला मिळालं मोठं गिफ्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनचे राष्ट्रापती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत, मात्र आता त्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत असून, चीन आणि अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! अमेरिकेचा भारताला सर्वात मोठा धक्का, ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनला मिळालं मोठं गिफ्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2025 | 7:47 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोन्ही देशांमध्ये एक मोठ्या व्यापारी करावर सहमती झाली आहे. याबाबत चीनचे सर्वोच्च प्रवक्ते चेंगगांग आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना चेंगगांन यांनी सांगीतलं की, चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा युद्धविराम , निर्यात धोरणासंबंधी नियंत्रण आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर यावेळी अमेरिका आणि चीनमध्ये चर्चा झाली, त्यानंतर या करारावर प्राथमिक सहमती दर्शवण्यात आली आहे.

दरम्यान चीनकडून अमेरिकेला रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा करण्यात येत होता, मात्र चीनने अचानक ही निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं, त्यानंतर अमेरिकेनं देखील चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या घोषणेनंतर चीन आणि अमेरिकेमध्ये एका नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली, ज्याचा परिणाम हा संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. दरम्यान व्यापार युद्धामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न या कराराच्या माध्यमातून सुरू असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे अमेरिका चीनसोबत झटपट मोठा व्यापारी करार करण्याच्या तयारीमध्ये आहे, दोन्ही देशांकडून त्यावर सहमती देखील दर्शवण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे अमेरिका आणि भारतामध्ये होणारा व्यापारी करार अजूनही मध्येच अडकला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये देखील एक मोठा व्यापारी करार होणार आहे, ज्याचा उद्देश येत्या 2029 पर्यंत अमेरिका आणि भारतामधला व्यापार हा दुपटीवर पोहोचवणे आहे, मात्र अनेक असे विषय आहेत, ज्यावर अजूनही दोन्ही देशांचं एकमत होऊ न शकल्यानं हा व्यापारी करार पूर्ण होऊ शकलेला नाहीये, मात्र भारताआधी अमेरिका आता चीनसोबत मोठा व्यापारी करार करणार आहे, हा भारतासाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान चीनने रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आमची मदत करावी अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी आपल्या आशिया दौऱ्यापूर्वी केली होती. या पार्श्वभूमीवर देखील हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.