काऊंट डाऊन सुरू, व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग, आता थेट इराणवर…, जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेकडून पुन्हा एकदा हादरवणारी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग आहे. अमेरिकेचं सैन्य तयार झालं आहे.

काऊंट डाऊन सुरू, व्हाईट हाऊसमध्ये घडामोडींना वेग, आता थेट इराणवर..., जगभरात मोठी खळबळ
jd vance
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 4:04 PM

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धाचा मोठा फटका हा जगाला बसत असून, जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमकी देण्यात येत आहे. जर लवकरात लवकर डील नाही झाली तर आम्ही इराणवर कधीही हल्ला करू शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्याकडून इराणला हादरवणारी धमकी देण्यात आली आहे. आम्ही इराणला कधीच अण्वस्त्र बनवू देणार नाहीत, न्युक्लिअर व्हेपन्स प्रोग्राम अत्यंत संवेदशील आहे. जर इराणने अण्वस्त्र बनवले तर संपूर्ण जगभरात विशेष: आखाती देशांमध्ये अण्वस्त्र बनवण्याची स्पर्धा सुरू होईल, त्यामुळे आम्ही इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र बनवू देणार नाहीत, असं जेडी वेंस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी इराणला थेट धमकी देखील दिली आहे. जर इराणने लवकरात लवकर न्युक्लिअर डील केली नाही तर आम्ही पुन्हा त्यांच्यावर हल्ला करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील म्हटलं आहे की, इराणजवळ कधीच अण्वस्त्र असू शकत नाही, असं वेंस यांनी म्हटलं आहे. ते व्हाइट हाऊसमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला वाटतं इराणने करार केला पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला सांगितलं होतं की, जर शातंतेच इराणसोबत चर्चा करा, ते आम्ही केलं. परंतु जर आता इराणने डील केली नाही, तर अमेरिका सैन्य ऑपरेशन्ससाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही त्यांच्यावर कधीही हल्ला करू शकतो. इराणकडे न्युक्लिअर व्हेपन्स असणं म्हणजेच याचा अर्थ असा की त्यासाठी संपूर्ण जगात स्पर्धा सुरू होईल, असं जेडी वेंस यांनी म्हटलं आहे.

जर आता इराण मागे हटला तर आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, आम्हाला त्या मार्गाने जायचं नाही, आम्ही त्या मार्गावर जाण्यापासून वाचत आहोत, परंतु जर इराण तयार होत नसेल तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार आमचं सैन्य तयार आहे, त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो असं जेडी वेंस यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणला धमकी दिली आहे, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार असा कोणत्याही दिवशी इराणवर हल्ला होऊ शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.

Follow Us