जग हादरलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, आता युद्ध अटळ? थेट फायटर जेटस्….

डोनाल्ड ट्रम्प हे कायम या न त्या कारणासाठी चर्चेत असतात, दरम्यान त्यांनी आता मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मोठी बातमी समोर येत आहे.

जग हादरलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, आता युद्ध अटळ? थेट फायटर जेटस्....
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 19, 2026 | 8:46 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम या न त्या कारणामुळे चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं, अमेरिकेनं अनेक देशांवर टॅरिफ लावला. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं व्हिसाबाबत देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर थेट हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली होती, हे सर्व घडत असताना आता अमेरिकेकडून सध्या ग्रीनलँडवर देखील ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, यावरूनच आता युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका आमने-सामने आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या अमेरिकेच्या धोरणाला विरोध करणाऱ्या आठ युरोपियन राष्ट्रांवर दहा टक्के टॅरिफ लावला आहे. हा टॅरिफ आणखी वाढवला जाऊ शकतो अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे.

दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे, अमेरिकेच्या वाढलेल्या सैन्य हालचालींमुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे, अमेरिकेकडून फायटर जेट्स, एअरस्काफ्ट कॅरिअर आणि मिसाईल तैनात करण्यात आल्या आहेत, अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे पुन्हा एकदा काहीतरी मोठं घडणार याचे संकेत मानले जात आहेत. अमेरिकेकडून जॉर्डमध्ये 12 F-15 फायटर तैनात करण्यात आले आहेत. डिफेंन्स सिक्योरिटी आशियाच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं 12 F-15 फायट्स जेट आणि 4 KC-135 विमानं हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता असलेले विमानं जॉर्डनच्या मुवाफ्फक सॉल्टी एअरबेसवर तैनात केले आहेत.

दरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना ही एक रुटीन प्रक्रिया असल्याची माहिती दिली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते ही अमेरिकेची केवळ एक रुटीन प्रक्रिया नसून, अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराणवर हल्ल्याची तयारी सुरू झाली आहे. अमेरिका आता इराणवर पुन्हा एकदा हल्ला करण्याची शक्यता आहे. इराणकडून होणाऱ्या मिसाईल हल्ल्यांना रोखण्यासाठी यापूर्वी देखील अमेरिकेनं जॉर्डनचं एअरबेस वापरलं आहे.