Sugar prices : साखरेच्या भावात प्रचंड वाढ, किंमतीविरोधात ते एक वाक्य पडलं भारी…, सरकारी अधिकाऱ्याचं थेट तडकाफडकी निलंबन
गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात प्रचंड वाढ सुरू असल्याचं दिसून येत आहे. मात्र यावर टीप्पणी करणं एका सरकारी अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे, साखरेचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे. चहा महाग झाला आहे. दरम्यान साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्यामुळे आता साखरेच्या दरावरून वेगवेगळे मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच सोशल मीडियावर केली गेलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. ही पोस्ट जैनपूरचे लेखापाल अशोक कुमार यादव यांनी केली होती. मात्र ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची शाहगंज तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली, त्यानंतर तातडीने अशोक कुमार यांच्या नावाने एक लेटर जारी करण्यात आलं असून, त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
‘चाय खतरे में है मित्तर, चीनी पहुंच गई सत्तर’ अशी पोस्ट अशोक कुमार यादव यांनी सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली ही, पोस्ट व्हायरल होताच या प्रकरणाची शाहगंज तहसील प्रशासनाकडून गंभीर दाखल घेण्यात आली, त्यानंतर प्रशासनाने एक पत्र जारी करत त्यांना तडकाफडकी निलंबीत केलं आहे. या करावाईनंतर तहसीत कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईवर समाजमाध्यमांमधून टीका केली जात आहे. ही कारवाई योग्य नसल्याचं अनेकांचं मत आहे.
रविवारी लेखापाल अशोक कुमार यादव यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली होती. ज्याच्या माध्यमातून त्यांनी साखरेच्या वाढल्या भावावर व्यंगात्मक पद्धतीने टिप्पणी केली होती.’चाय खतरे में है मित्तर, चीनी पहुंच गई सत्तर’ दरम्यान काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर त्यांना या प्रकरणाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. तहसील कार्यालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, अशोक कुमार यांचं निलंबन करण्यात आलं आहे.