AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी, शिंदे गटाचे टेन्शन वाढले, कपिल सिब्बल यांचा काल जोरदार युक्तीवाद..

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आहे. दिल्लीत घडामोडींना वेग आला. त्यातच आज कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद कोर्टात केला जाणार आहे. कपिल सिब्बल यांनी सुनावणीत मोठे दावे केले आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी, शिंदे गटाचे टेन्शन वाढले, कपिल सिब्बल यांचा काल जोरदार युक्तीवाद..
Hearing regarding Shiv Sena party and its symbol
| Updated on: Nov 26, 2026 | 7:41 AM
Share

शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणीला सुरूवात होईल. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आज देखील युक्तिवाद करणार आहेत. काल कपिल सिब्बल यांनी 45 मिनिटे युक्तिवाद केला होता. शिवसेना शिंदे गटाकडूनही युक्तीवाद झाला. कालच्या सुनावणीत महत्वपूर्ण मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडली. कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा सुभाष देसाई प्रकरणातील घटनापीठाच्या निकालाच्या थेट विरोधात आहे.

विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्षाचा दर्जा देता येत नाही, दहाव्या अनुसूचीनुसार हे मान्य नाही. पक्षातील मतभेद असल्याच्या नावाखाली केलेला पक्षांतराचा बचाव हा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा आधारही नव्हता. मतभेदांच्या नावाखाली राजकीय निष्ठा बदलण्यास परवानगी दिल्यास काही आमदारांच्या पक्षांतरातूनही सरकारे अस्थिर केली जाऊ शकतात.

विधानसभा अध्यक्षांसमोरील आमदार अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक आयोगासमोरील निवडणूक चिन्ह आदेशानुसार होणारी कार्यवाही या दोन्ही स्वतंत्र आहेत, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले. कथित पक्षांतराची पहिली घटना 21 जून 2022 रोजी घडल्याने मूळ राजकीय पक्षाची ओळख त्याच तारखेच्या परिस्थितीनुसार निश्चित केली पाहिजे.

निवडणूक आयोगाने त्यानंतर एखाद्या गटाला दिलेली मान्यता भविष्यातील परिणामांसाठी लागू होऊ शकते. मात्र, त्यावरून यापूर्वीची कृती पक्षांतर ठरते की नाही, हे निश्चित करता येणार नाही. पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतोदाला हटवणे, एकनाथ शिंदे यांना पुन्हा गटनेता म्हणून मान्यता देणे आणि राज्यपालांना ठरावाची माहिती देणे, या कृती पक्षातील मतभेद व्यक्त करण्यासाठी नव्हे, तर सरकार अस्थिर करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्या होत्या. खरेच वैचारिक मतभेद असते, तर पक्षाच्या संघटनात्मक संस्थांच्या बैठका बोलावून अंतर्गत पातळीवर मतभेद सोडवण्याचा प्रयत्न झाला असता, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार