AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील मंदार किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट! सख्ख्या भावानेच…; धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंदारवर हल्ला करण्याचा कट कोणी रचला होता, त्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील मंदार किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट! सख्ख्या भावानेच...; धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 7:51 AM
Share

पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या कोर्टाजवळ 6 जणांच्या टोळीने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. परंतु गोळीचा नेम चुकल्याचे हल्लेखोरांच्या लक्षात आले. त्यानंतर मंदारचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार केला. हल्लेखोरांनी मंदारचे दोन्ही हात तोडले. यावेळी हल्लेखोरांनी हम बाप है, अशी घोषणाबाजी केली. मागच्या वर्षी पुण्याच्या जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाची हत्या केली होती. यात किवळे देखील आरोपी होता. त्याला दोन दिवसांआधी जामीन मिळाला होता. याच किवळेवर हल्ला करण्यात आला. आता या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक जण अटकेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला होता. त्यानेच कटाची अंमलबजावणी केली होती. त्याने इतर आरोपींना देखील सुपारी दिल्याचे समोर आलं आहे. मागच्या वर्षी 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाणच्या हत्या प्रकरणात हल्ला केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शुभमने जवळपास 12 ते 15 तरुणांना एकत्र कट रचल्याचे समोर आलं आहे.

मुख्य हल्लेखोर फरार 

मंदार किवळेच्या हल्लाप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे आठ पथके रवाना झाल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलाय. परंतु मुख्य हल्लेखोर फरार असल्यामुळे पुणे पोलीस त्यांचा शोध घेताहेत.  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आठ टीम राज्याचा वेगवेगळ्या भागात रवाना झाल्या आहेत.

अखेर पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना आली जाग

शिवाजीनगर कोर्टबाहेर मंदार किवळेवर गोळीबार आणि कोयता हल्ल्या  झाल्याच्या प्रकरणानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार दिवसभर फिरकले नाहीत. ते कोर्टाच्या जवळ असलेल्या शिवाजीनगर मुख्यालयातच हजर होते.  परंतु ते पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत व्यस्त होते. पण पुण्याला हादरवणाऱ्या  न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर ते दिवसभर फिरकले नाहीत. आता मात्र पोलीस आयुक्तांना जाग आली आहे. ते आज गुरुवारी सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आवाराची पाहणी करणार आहेत.  त्यानंतर बैठक घेऊन पुढील कारवाई करणार आहेत.  परंतु घडलेल्या घटनेचं काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

आतापर्यंत पुणे पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात

1)अक्षय सुभाष चव्हाण – वय: २० वर्षे 2)अमोल रामचंद्र चव्हाण – वय: ४८ वर्षे 3)स्वप्निल बाजीराव गवळी – वय: २८ वर्षे 4)ओंकार संतोष पवार – वय: १८ वर्षे 5)सूरज साधू मालेकर – वय: २२ वर्षे 6)एक अल्पवयीन मुलगा

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार