कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यावर नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार : अमित शाह

| Updated on: Feb 12, 2021 | 12:46 AM

मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय.

कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यावर नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार : अमित शाह
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे (Amit Shah declare that will implement CAA after corona vaccination).

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे 2015 पूर्वी बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या गैरमुस्लीम नागरिकांशिवाय पश्चिम बंगालमधील मातोआ समुहाच्या नागरिकांना फायदा होईल, असं अमित शाह यांनी नमूद केलंय. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीमुळे भारतातील अल्पसंख्याक नागरिकांच्या नागरिकत्वावावर काहीही परिणाम होणार नाही. विरोधक नागरिकांची दिशाभूल करत आहे, असं मत शाह यांनी व्यक्त केलं. असं असलं तरी हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करतो हा आरोप वारंवार होतोय.

शाह म्हणाले, “मोदी सरकारने 2018 मध्ये नागरिकत्व कायदा आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे 2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर हा कायदा आणण्यात आला. मात्र, देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कायद्याची अंमलबजावणी प्रलंबित होती. ममता बॅनर्जी म्हणतात की आम्ही खोटं आश्वासन दिलं. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केलाय आणि याची अंमलबजावणी होऊ देणार नाही असं म्हटलंय. मात्र, भाजप दिलेली आश्वासनं नेहमीच पूर्ण करतं. आम्ही हा कायदा आणलाय आणि निर्वासितांना नागरिकत्व देऊ.”

देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेचच नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी सुरु होईल, असंही शाह यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

देशात CAA कधी लागू होणार? बंगालमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं विधान

कोणीही दिशाभूल करायला, आम्ही काय लहान मुलं नव्हे; ओवेसींचे मोहन भागवतांना चोख प्रत्युत्तर

डॉक्टर काफील खान यांचं भाषण एकतेचा संदेश देणार, तात्काळ सुटका करा : उच्च न्यायालय

व्हिडीओ पाहा :

Amit Shah declare that will implement CAA after corona vaccination