
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करत 26 जणांचा जीव घेतला. या दहशचतवादी हल्ल्याचा निषेध करत, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’ चालवण्यात आलं आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत कालपासून चर्चा सुरू आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्यावर भाषण करत महत्वाची माहिती दिली. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांचा जीव घेणारे दहशतवादी हे ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेले आहे, असं तसेच अमित शहांनी काल करण्यात आलेल्या ऑपरेशन महादेव बद्दलही सांगितलं.
संसदेतील भाषणादरम्यान अमित शाह यांनी पहलमाग हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पूर्ण कारवाईची स्पष्ट माहिती देत पाकिस्तानची पोलखोलही केली. पहलगाम हल्ल्यानंतर 7 मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर झाले. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणे आपल्या सैन्याने उद्ध्वस्त केली. आपण यावेळी पाकिस्तानाच्या भूमीत 100 मीटर आत घुसून केला. आम्ही अतिरेक्यांना मारलं असं अमित शाह म्हणाले. मात्र यावेली पाकिस्तानकडून झालेल्या एका चुकीचाही अमित शाह यांनी उल्लेख केला. काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री ?
आम्ही अतिरेक्यांना ठार केलं
पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सीसीएसची मिटिंग घेतली. सैन्याला पूर्ण ऑपरेशनल फ्रिडम देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. 7 मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर झाले. पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. या पेक्षा संयमित हल्ला होऊ शकत नाही. जगात युद्ध होत आहे. तिथे लहान मुलं आणि महिला पुरुष मरत आहे. आम्ही हल्ला केला. पण एकही निष्पाप नागरिक मारला नाही. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला होता. तो आपल्याच भूमीत हल्ला होता. कारण पाकव्याप्त काश्मीर आपलाच होता. पण आम्ही यावेळी पाकिस्तानाच्या भूमीत 100 मीटर आत घुसून केला. बहावलपूर, मुरीदके, सवाई नल्लाह इथले तळ आम्ही उध्वस्त केल, आम्ही अतिरेक्यांना मारलं असं अमित शाह म्हणाले.
पण पाकने एक चूक केली…
कमीत कमी 100 लोकांना मारलं आहे,त्यात 8 मोठे दहशतवाही मारले गेले. यावरही तुम्हाला अभिमान वाटत नाही? असा सवाल अमित शाह यांनी विचारला. 7 मे रोजी 1 वाजून 22 मिनिटांनी आमचं काम संपलं. आमच्या डीजीएमओने त्यांच्या डीजीएमओला सांगितलं की आम्ही फक्त दहशतवादी तळावर हल्ला केला. तो आमच्या आत्मरक्षणाचं अधिकार आहे. हे मनमोहन सिंग सरकार सारखं नाही, की ते येतील, मारतील आम्ही चूपचाप शांत बसू आणि चर्चा करू. पण हे नरेंद्र मोदी सरकार आहे. ऊरीत हल्ला झाला, आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा आम्ही 100 मीटर आत घुसून हल्ला केला. आम्ही तर पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला. पण पाकिस्तानने एक चूक केली. दहशतवादी तळांवर जो (आपण ) हल्ला केला, त्याला त्यांनी (पाकिस्तान) तो आमच्यावरचा हल्ला झाला असं त्यांनी मानल, असं त्यांनी सांगितलं. आमचा दहशतवादाशी काही संबंध असं ते जगभर सांगत होते , आम्ही तर पीडित आहोत, असा दावा पाकिस्तान करत होतं.
पण, दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. हे संपूर्ण जग बघेल हे पाकिस्तानला कळलं नाही. तेव्हा सैन्याचे अधिकारी, त्यांच्या अंतयात्रेत,जनाजात होते. त्यांनी प्रार्थना केली. जनाजाला खांदा दिला. त्यांना वाटलं हे जग पाहणार नाही. पण जगाने सर्व पाहिलं. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला एक्सपोज केलं. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम पाकिस्तानात चालू आहे, हे एक्सपोज झाल, सगळ्यांना दिसून आलं असं सांगत अमित शाह यांनी पाकची पोलखोल केली.