AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या बसचा मोठा अपघात! 6 जवान शहीद, नदीत कोसळून बसचा चक्काचूर

ITBP Bus Accident : 37ITBP जवान आणि दोन J&K पोलीस कर्मचारी घेऊन जाणारी बस पहलगाममध्ये नदीच्या पात्रात पडली. एकूण सहा जवान या भीषण अपघातत शहीद झालेत. तर कित्येक जवान जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला.

ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या बसचा मोठा अपघात! 6 जवान शहीद, नदीत कोसळून बसचा चक्काचूर
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Aug 16, 2022 | 1:21 PM
Share

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या बसचा मोठा अपघात (ITBP Bus accident News) झालाय. 37 ITBP जवान आणि दोन J&K पोलीस कर्मचारी घेऊन जाणारी बस पहलगाममध्ये (Pahalgam News) नदीच्या पात्रात (ITBP Bus accident Video) उलटली. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मोठी जीवितहानी या अपघातात झाली असण्याची भीती व्यक्त केली जातेय. प्राथमिक माहितीनुसार, चंदनवाडी जवळ ही बस दरीत कोसळली. काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यही समोर आली आहे. एकूण सहा जवान या भीषण अपघातत शहीद झालेत. तर कित्येक जवान जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता, याची निव्वळ कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे.

पाहा व्हिडीओ :

थोडक्यात, पण महत्त्वाचं

  • आयटीबीपीच्या बसचा मोठा अपघात
  • जम्मू काश्मीरात आयटीबीपीची बस थेट नदीत कोसळळी
  • एकूण 39 जण बसमध्ये होते
  • 38 जणांमध्ये 37 जण आयटीबीपीचे सैनिक तर दोघे जम्मू काश्मीर पोलीस
  • एकूण 6 जवान भीषण अपघातात शहीद झाल्याची माहिती
  • 32 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
  • चंदवाडीहून पहलगामचा जात असतेवेळी बसचा अपघात

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्वीट :

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. युद्धपातळीवर बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. जखमी जवानांनी अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्यात आलं. रुग्णवाहिकांही जखमी जवानांना घेऊन लगेचच रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, 32 जवान या दुर्घटने गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...