पाच महिन्यानंतर अंजू भारतात आली, पाकिस्तानातून का आली परत ? पाहा

देशात पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारताचा सचिन यांची जशी अनोखी सीमापार लव्ह स्टोरी गाजली तशी त्याच वेळी भारताची अंजू आणि पाकिस्तानचा नसरुल्लाह यांचीही लव्हस्टोरी समाजमाध्यमात चर्चेत होती. आता अंजू पाच महिन्यांनंतर पुन्हा भारतात आली आहे. त्यामुळे आता या स्टोरीला काय वळण लागतं याची उत्सुकता लागली आहे.

पाच महिन्यानंतर अंजू भारतात आली, पाकिस्तानातून का आली परत ? पाहा
anju love story
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 29, 2023 | 7:56 PM

मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीणा यांची अनोखी प्रेमकथा गाजत होती, त्याचवेळी अंजू या भारतीय तरुणीची पाकिस्तानच्या तरुणासोबत प्रेमकथाही गाजली. आता या कथेची नायिका अंजू बुधवारी भारतात परतली आहे. पाकिस्तानात पाच महिने राहिल्यानंतर अंजू भारतात परतली आहे. तिचा पाकिस्तानी पती तिला वाघा बॉर्डरपर्यंत सोडायला आला होता. अंजू थोड्या दिवसांसाठीच भारतात आली आहे. आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती आली आहे. अंजू सध्या बीएसएफच्या कॅंपमध्ये असून विमानाने ती अमृतसरहून दिल्लीला जाणार आहे.

अंजू तिचा पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राजस्थानच्या अलवर येथे रहात होती. सोशल मिडीयावर तिची ओळख पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे रहाणाऱ्या नसरुल्लाह याच्याशी झाली. 21 जुलै 2023 रोजी अंजू घरातून जयपूरला आपल्या मित्रांना भेटायला जात सांगून गेली होती. त्यानंतर टुरिस्ट व्हीसावर ती पाकिस्तानात गेली. पाकिस्तानात तिने नसरुल्लाह सोबत लग्न केले. गेले पाच महिने ती नसरुल्लाह सोबत रहात होती.

चार महिने ऑनलाईन अफेअर

नसरुल्लाह याच्या मते अंजू आणि तिचे चार महीने ऑनलाईन अफेअर चालू होते. याच दरम्यान नसरुल्लाहने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. अंजूने तो स्वीकारला. ती वाघा बॉर्डरहून इस्लामाबादला गेली. तेथून ती डीरला पोहचली. अंजूने पाकिस्तानात आपला धर्मही बदलला आणि ती अंजूची फातिमा बनली.

अरविंद झाला नाराज

अंजू थॉमस मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूर गावातील रहिवासी आहे,2007 मध्ये तिचे लग्न बलिया येथील अरविंद कुमारशी झाले. दोघांचे हे लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर ती अलवरच्या भिवाडी येथे राहू लागली. दोघेही येथे खाजगी नोकरी करीत होते. अंजूच्या पाकिस्तान जाण्याने तिचा पती अरविंद नाराज आहे. अरविंद याने अंजूला केव्हाच मुलांशी भेटू दिले जाणार नाही असे म्हटले आहे.