जेठमलानी साहेब आगे बढो… सुनील प्रभू यांची घोषणा; सुनावणीवेळी असं काय घडलं?

एका मेलच्या मुद्दयावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची चांगलीच कोंडी झाली. 22 जून 2022 चा हा मेल होता. प्रभू यांनी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हॉट्सअप केल्याचं सांगितलं. नंतर मेल पाठवल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रभू यांनी आपली साक्ष बदलण्याची विनंतीही केली. प्रभू यांची ही विनंती विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ मंजूर केली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची आजची सुनावणी संपली. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे.

जेठमलानी साहेब आगे बढो... सुनील प्रभू यांची घोषणा; सुनावणीवेळी असं काय घडलं?
mahesh jethmalani and sunil prabhuImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 7:04 PM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, 29 नोव्हेंबर 2023, मुंबई : व्हीपच्या मुद्द्यावरून आजही ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलट तपासणी करण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अडचणीचे प्रश्न करून प्रभू यांची चांगलीच कोंडी केली. त्यामुळे प्रभू यांना आपली साक्ष बदलावी लागली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रभू यांची साक्ष बदलण्यास नकार दिला. यावेळी प्रभू यांनी वकील महेश जेठमलानी यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. मी तुमचा प्रचार केलाय. जेठमलानी साहेब आगे बढोच्या घोषणा दिल्या आहेत, अशा शब्दात प्रभू यांनी जेठमलानी यांची फिरकी घेतली. तर, तेव्हा युती होती असा टोला जेठमलानी यांनी लगावला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनीही दोघांना चिमटा काढला. त्यामुळे सुनावणीवेळी एकच खसखस पिकली होती.

जेठमलानी – प्रश्न क्रमांक १६५ च्या उत्तरात बदल केला आहे. आपण म्हटलं की माहिती घेतली आहे. आपण कुणाकडून माहिती घेतली?

प्रभू – मी माझ्या कार्यालयाकडून माहिती घेतली.

जेठमलानी – आपण ही माहिती व्यक्तिशः कार्यालयात जाऊन घेतली? की फोनवरून घेतली?

प्रभू – माझ्यासोबत माझे सहकारी व सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले. त्यांकडून ही माहिती घेतली

जेठमलानी – तुम्ही स्वतः मेल केला होता का?

प्रभू – मी स्वतः नाही, तर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जोशी आहेत. त्यांना मेल करायला सांगितला होता.

जेठमलानी – आपण लंच ब्रेक दरम्यान जोशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा मेल पाठवल्याची खात्री केली का?

प्रभू – होय

जेठमलानी – आपण जोशी यांच्याशी कुठे बोललात?

प्रभू – या इमारतीत बोललो

जेठमलानी – म्हणजे जोशी याठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना येथे भेटला?

प्रभू – खाली कार्यालयात, तळमजल्याला. लंच टाईममध्ये दानवे साहेबांच्या केबिनमध्ये मी भोजनासाठी बसलो होतो, तिथे बोलवून मी त्यांना विचारले.

जेठमलानी – तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला ?

प्रभू – मी त्यांना असं विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो. पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा. त्यावेळी त्यांना तो मेल आढळला आणि त्यांनी मला सांगितलं.

जेठमलानी – ज्याअर्थी त्यांना हे ईमेल सापडलेले आहेत, तुम्ही एकाच इमारतीत आहात तर तुम्ही त्यांना या ईमेलच्या प्रिंट आऊट का सादर करायला सांगितल्या नाहीत?

प्रभू – मी सांगितले ना तुम्हाला, मी खरं बोललो, मी उद्या तुमच्यासमोर सादर करतो

जेठमलानी – वरच्या उत्तरात तुम्ही जोशी यांची कार्यपद्धती सांगितली आहे. ती तुम्हाला कधी पासून माहीत आहे?

सुनील प्रभू – जेव्हा पासून आमदारांना ईमेल आणि पत्र पाठविण्याची पद्धत सुरु झाली तेव्हापासून

जेठमलानी – जोशी यांचं हे काम आहे हे तुम्हाला कधीपासून माहीत आहे?

प्रभू – जेव्हापासून ईमेल वरती आमदारांना पत्र आणि व्हीप पाठवण्याची पद्धत सुरू झाली तेव्हापासून

जेठमलानी – या प्रथेबाबत 2014 पासून तुम्हाला माहित होतं तर 22 जूनला एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतून पाठवलेल पत्र ईमेलवरून पाठवलं आहे हे तुम्ही तुमच्या अपात्रता याचिकेत का नाही सांगितल?

प्रभू – रेकोर्डवर आहे

प्रभू – मला सगळ्या पद्धती माहिती आहेत. तुमच्या वांद्रे येथील प्रचार मी केला होता. मी घोषणा देण्यासाठी पुढे होतो. जेठमलानी साहेब आगे बढो. मी तुमचा प्रचार केला आहे. तुमचे प्रचार प्रमुख अनिल परब होते, असं म्हणत सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांना कोपरखळी मारली.

जेठमलानी – हो मला माहिती आहे, तेव्हा युती होती

अध्यक्ष – ( उपहासात्कम ) म्हणून तर सोपे प्रश्न येत नाही ना ?

सुनावणीदरम्यान एकच हास्यकल्लोळ

जेठमलानी – जेवणाच्या सुट्टी दरम्यान असं काय आठवलं की तुम्ही जोशींसोबत बोललात?

प्रभू – पत्र हे वॉट्सपने पाठवलं असं म्हटलं होत. पण माझ्या मनात शंका होती. खरी बाजू पटलावर यावी म्हणून जोशी सोबत बोलून घेतलं.

जेठमलानी – एकनाथ शिंदे यांना जोशी यांनी पाठवलेला ईमेल आता आपण मागवून घेऊ शकता का?

प्रभू – मी उद्या सादर करतो म्हणून बोललो आहे

जेठमलानी – आत्ता जर तुम्ही एकाच इमारतीत आहात तर आत्ता का नाही

प्रभू – सर ते ४ वाजता निघून गेले असतील, म्हणून मी म्हटलं की उद्या सकाळच्या सत्रात सादर करतो

जेठमलानी – जर ते आता असतील, तर विचारून घ्या. उद्यापर्यंत कशाला वाट पाहायची

प्रभू – मी आता लगेच चेक करतो.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.