भारतात केव्हा झाला होता पहिला एक्झिट पोल ? अंदाज चुकला होता की बरोबर आला होता ?

नव्वदच्या दशकात आपल्याकडे खाजगी वाहिन्यांचे पेव फुटले आणि निवडणूकांचे वार्तांकनाचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण सुरु झाले. त्यानंतर एक्झिट पोलचा दौर सुरु झाला. आता तर प्रत्येक मिडीया हाऊसचा स्वतंत्र एक्झिट पोल जारी होऊ लागला आहे. एक्झिट पोलची ही प्रथा नेमकी केव्हा सुरु झाली हे पाहूयात...

भारतात केव्हा झाला होता पहिला एक्झिट पोल ? अंदाज चुकला होता की बरोबर आला होता ?
assembly election 2023 exit pollImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 6:34 PM

मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूकांत कोणत्या पक्षाचे सरकार येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. चार राज्यातील मतदान अर्थात मतदारांचा कौल मतदान पेटीत बंद झाले आहे. तेलंगणामध्ये उद्या ( 30 नोव्हेंबर ) मतदान आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता एक्झिट पोल येणे सुरु होणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांना कल जोखला जातो. त्यानंतर एक्झिट पोल जारी होतो. सर्वसामान्य जनतेबरोबर राजकीय पक्ष देखील या एक्झिट पोलवर लक्ष ठेवून असतात. चला तर पाहूया एक्झिट पोलची परंपरा केव्हापासून सुरु झाली ?

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ( सीएसडीएस ) या संस्थेने 1960 मध्ये एक्झिट पोल्सचा आराखडा सादर केला होता. मतदान झाल्यानंतर जनतेचा कल पाहून निकाल लागण्यापूर्वी त्याचा अंदाज काढला गेला होता. या प्रक्रीयेस एक्झिट पोल असे नाव देण्यात आले होते. या निवडणूक निकाल पूर्व अंदाजांना आता लोक गांभीर्याने घेत आहेत. राजकीय पक्ष देखील त्याकडे लक्ष ठेवून असतात. मात्र सुरुवातीला मात्र त्याकडे कोणी शास्र म्हणून  पाहायला तयार नव्हते.

केव्हा पासून सुरु झाली प्रथा

भारतात पहिला एक्झिट पोल साल 1996 मध्ये जारी झाला होता. या वर्षी लोकसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. या एक्झिट पोलला सीएसडीएसने संस्थेनेच तयार केले होते. या एक्झिट पोलमध्ये देशात खंडीत जनादेश येऊ शकतो असा निष्कर्ष निघाला होता. त्यावेळी एक्झिट पोलचे हे तंत्र लोकांसाठी खूपच नवे होते. त्यामुळे त्याच्यावर खूपच निवडक लोकांना विश्वास होता.

अंदाज खरा निघाला कि खोटा

जेव्हा सर्वसाधारण निवडणूकांचा निकाल आला, तेव्हा सर्वजण आर्श्चचकीत झाले. कारण हा एक्झिट पोल जवळपास खरा निघाला होता. 1996 च्या लोकसभा निवडणूकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, परंतू बहुताचा आकडा काही गाठू शकली नाही. त्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले. परंतू ते बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने 13 दिवसाचं हे सरकार कोसळलं..

एक्झिट पोलचा ट्रेंड वाढला

त्यानंतर 1998 च्या लोकसभा निवडणूकामध्ये तर जवळपास प्रत्येक मिडीया हाऊसनी एक्झिट पोल जारी केला. कारण हे एक शास्र आहे असे जवळपास मान्य करण्यात आले. पोलच्या मते एनडीएला 214-249 दरम्यान जागा मिळतील आणि युपीएला 145-164 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या आकड्यांच्या जवळपास निवडणूक निकाल लागले. एनडीएला 252 आणि युपीएला 166 जागा मिळाल्या.

जेव्हा खोटा ठरला एक्झिट पोल

2004 च्या लोकसभा निवडणूकांत भाजपाचा मोठा पराभव झाला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा ‘इंडिया शायनिंग’ नारा फ्लॉप झाला. आणि देशातील एक्झिट पोलही फ्लॉप झाले. एक्झिट पोलनी भाजपा पुन्हा जनता सत्तेवर बसविणार असा अंदाज वर्तविला होता. परंतू एनडीएला 200 चा आकडा ही पार करता आला नाही. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला 222 जागा मिळाल्या. कॉंग्रेसने सरकार स्थापण केले आणि पंतप्रधान पदी डॉ. मनमोहन सिंह विराजमान झाले. त्यानंतर मोठ्या निवडणूकांपासून छोट्या-छोट्या निवडणूकांचेही अंदाज वर्तविणारे एक्झिट पोल येऊ लागले. केव्हा त्यांचे अंदाज खरे आले तर केव्हा चुकले. एक्झिट पोल अजूनही जारी असून त्याचे पिक वाढले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.