डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ठरले व्हिलन, भारताला सर्वात मोठा झटका, पुतिन भारत दैऱ्यावर असतानाच अमेरिकेतून मोठी बातमी

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेतून आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ठरले व्हिलन, भारताला सर्वात मोठा झटका, पुतिन भारत दैऱ्यावर असतानाच अमेरिकेतून मोठी बातमी
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला धक्का
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 04, 2025 | 9:02 PM

भारत आणि अमेरिकेदरम्यान एक मोठी व्यापारी डील होणार आहे, त्याचा मोठा फयदा भारताला होऊ शकतो. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून या व्यापारी डीलला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यापारी कराराबाबत जोरदार चर्चा सुरू होती, भारत आणि अमेरिकेमधील संबंधित नेत्यांकडून या करारावर प्रतिक्रिया देखील समोर आल्या होत्या. लवकरच आता अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील होऊ शकते असं वातावरण होतं. मात्र अचानक या संदर्भात सुरू असलेली चर्चा थंडावल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता नेमकं असं काय झालं, की ज्यामुळे अमेरिका आणि भारतामध्ये होणाऱ्या करारावर सुरू असलेली चर्चा मागे पडली आहे? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे.

बिझनेस वर्ल्डच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं भारतासमोर अशी एक अट ठेवली आहे, ज्यामुळे आता ही चर्चा मागे पडल्याचा दावा केला जात आहे. जर भारताला टॅरिफमधून दिलासा हवा असेल आणि आपल्या वस्तू अमेरिकेच्या मार्केटपर्यंत पोहोचवायच्या असतील तर भारताला आधी F‑35 हे लढाऊ विमान खरेदी करावं लागेल अशी अट अमेरिकेनं ठेवली आहे. भारताला F-35 हे लढाऊ विमान केवळ स्टॅडऑन मोडसाठी नव्हे तर आपल्या नव्या धोरणांचा केंद्रबिंदु म्हणून विचारात घ्यावं लागेल असंही अमेरिकेनं म्हटलं आहे, त्यामुळे आता ही चर्चा थांबली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार जर भारत आणि अमेरिकेमध्ये हा व्यापार करार झाला असता, तर या कराराच्या माध्यमातून 2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार हा पाच पटीने वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, त्याचा मोठा फायदा हा भारताला झाला असता, सोबतच या करारामुळे भारतावरील अमेरिकेनं लावलेला टॅरिफ देखील कमी होण्याची शक्यता होती. मात्र आता अमेरिकेच्या या अटीमुळे या कराराला विलंब होत असल्याचं बोललं जात आहे, हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी म्हणजे रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर असून, यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक मोठे करार होण्याची शक्यता आहे.