भारत दौऱ्यापूर्वी पुतिन यांचा टॅरिफवरून ट्रम्प यांना थेट मोठा इशारा, अमेरिकेत खळबळ, भारतासाठी गुडन्यूज
रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत, मात्र भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यांनी मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे आता अमेरिकेचं टेन्शन वाढलं असून, चीन आणि पाकिस्तानला देखील मोठा धक्का बसला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या या भारत दौऱ्यामध्ये ते अनेक करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. पुतिन यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच अमेरिकेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे आता अमेरिकेत खळबळ उडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील कौतुक केलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून, भारताची रशियासोबत जवळीक वाढत आहे, त्यातच आता रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार असून, यामुळे चीन,पाकिस्तानसोबतच अमेरिकेचं देखील टेन्शन वाढलं आहे. भारत आणि रशियाची मैत्री वाढू नये असं अमेरिकेला वाटतं.
दरम्यान भारत दौऱ्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना एक प्रश्न विचारण्यात आला, अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, या माध्यमातून रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी भारतावर दबाव टाकला जात आहे का? त्यावर बोलताना पुतिन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हो कोणाच्याही दबावात येणारे नेते नाहीयेत असं पुतिन यांनी म्हटलं आहे. तसेच त्यापूर्वी दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरून देखील अमेरिकेला इशारा दिला होता, जर त्यांना कुठल्याही प्रकारचं युद्ध किंवा संघर्ष हवा असेल तर रशियाची तयारी आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान पुढे बोलताना पुतिन यांनी असं देखील म्हटलं आहे की, संपूर्ण जगानं भारताचं नेतृत्व पाहिलं आहे, देशाला आपल्या नेतृत्वावर अभिमान पाहिजे. भारत आणि रशियामध्ये आपल्या भारत दौऱ्यापूर्वीच 90 टक्के करार यशस्वी पूर्ण झाले आहेत, असंही यावेळी पुतिन यांनी म्हटलं आहे. मी माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भारतात जात आहे, त्यामुळे भारत दौऱ्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, असंही यावेळी पुतिन यांनी म्हटलं आहे. आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान अनेक गोष्टींवर चर्चा होईल असंही यावेळी पुतिन यांनी म्हटलं आहे.
