मोठी बातमी! आणखी एका पक्षात फूट, 17 खासदार करणार भाजपात प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरूच आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. तब्बल 17 खासदार भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! आणखी एका पक्षात फूट, 17 खासदार करणार भाजपात प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड
भाजपात मोठा पक्ष प्रवेश
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 6:13 PM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलचा मोठा पराभव झाला आणि भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूलमध्ये मोठी फूट पडली. आधी आमदाराच्या गटाने पक्षातून बंडखोरी केली. या आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून विधानसभा अध्यक्षांकडून परवानगी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर खासदारांच्या गटाने देखील तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी केली, वीस खासदार पक्षातून बाहेर पडले, त्यांनी तृणमूलमधून नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये प्रवेश केला. दरम्यान आता एनसीपीआयमध्ये देखील मोठी फूट पडली आहे. एनसीपीआयमधले 20 पैकी 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा, तृणमूलमधून बंडखोरी केलेले खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांच्याकडून करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

17 खासदार एकाचवेळी भाजपात प्रवेश करणार आहेत, पक्ष प्रवेशाची तयारी अंतीम टप्प्यात आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. वीस पैकी 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तृणमूलमधून वीस खासदारांनी बंडखोरी केली होती. त्यांनी एनसीपीआयमध्ये प्रवेश केला. मात्र त्यापैकी आता 17 खासदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा आकडा एक तृतिआंशपेक्षा मोठा असल्याने या खासदारांची खासदारकी भाजपमधील पक्ष प्रवेशामुळे धोक्यात येणार नाहीये. आता हे खासदार लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढे बोलताना बसुनिया यांनी म्हटलं की, वीस पैकी तीन खासदार हे अल्पसंख्यांक समुदायातून येतात. हे तीन खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीयेत.ते भाजपला बाहेरून पाठिंबा देणार आहेत. यामध्ये अबू ताहेर, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण या खासदारांचा समावेश आहे. हे खासदार भाजपमध्ये प्रवेश न करता भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपच्या खासदारांची संख्या वाढणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us