संपूर्ण काश्‍मीर आपलं, सरकारने आदेश दिल्यास PoK देखील जिंकू : लष्कर प्रमुख

भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरबाबत मोठे वक्तव्य केलं आहे (Army Chief on PoK).

संपूर्ण काश्‍मीर आपलं, सरकारने आदेश दिल्यास PoK देखील जिंकू : लष्कर प्रमुख
Follow us
| Updated on: Jan 11, 2020 | 4:47 PM

नवी दिल्ली : भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरबाबत मोठे वक्तव्य केलं आहे (Army Chief on PoK). पाकव्याप्त काश्मीरसह (POK) संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतचा आहे. सरकारने आदेश दिल्यास भारतीय सैन्य पीओकेवरही नियंत्रण मिळवले, असं मत लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केलं (Army Chief on PoK). नरवणे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका सांगितली.

मनोज नरवणे म्हणाले, “जम्मू काश्मीरमध्ये सर्वांनीच चांगलं काम केलं आहे. तेथील लोक खूपच सहकार्य करणारे आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासन देखील भरपूर सहकार्य करते. संसदेच्या ठरावानुसार पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे. जर संसदेने इच्छा व्यक्त केली आणि सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानच्या नियंत्रणातील काश्मीरवर देखील आम्ही नियंत्रण मिळवू. यासाठी भारतीय सैन्य योग्य ती पाऊले उचलेल.”

नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय सैन्य अधिक सक्रिय आहे. आपल्याला दररोज गुप्त माहिती आणि अलर्ट मिळत असतात. या माहितीला आपण गांभीर्याने घेत योग्य ती पाऊलं उचलतो. या सतर्कतेमुळेच आपण दहशतवादी घातपाताच्या कारवाईंना रोखण्यात यशस्व ठरतो.”

लष्कर प्रमुखांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची (CDS) नियुक्ति करण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे सैन्याच्या विविध विभागांचं एकीकरण करण्यासाठी मोठं पाऊल आहे.
  • पश्चिमी सीमेवर आपल्याला अधिक धोका आहे. यासाठी येथे 6 अपाचे हेलीकॉप्टर तैनात करण्याची गरज आहे.”
  • सैन्यासाठी शस्त्र खरेदीचा असेल किंवा जवानांच्या भरतीचा असेल, भारताला येणाऱ्या काळात संख्येपेक्षा गुणवत्तेवर जोर द्यावा लागेल. भारतीय सैन्य पहिल्यापेक्षा आज अधिक ससज्ज आहे. असं असलं तरी भविष्याचा विचार करुन आपल्या सैन्याला अधिक प्रशिक्षण द्यावं लागेल.
  • काश्मीर खोऱ्यात तैनात सैन्याच्या अधिकाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारी निराधार असल्याचं सिद्ध झालं आहे. कमांडरच्या निर्णयाचा आदर करायला हवा.
  • भारतीय सैन्यात 6 जानेवारीपासून 100 महिला जवानांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरु झालं आहे.
  • मध्य-पूर्व (Middle-East) भागात तणाव वाढला असून तेथे यूक्रेनचे नागरिक प्रवास करत असलेलं विमान पाडण्यात आलं. हे टाळण्यासाठी एअर डिफेन्स कमांडची स्थापना करणे योग्य पाऊल आहे. यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काम करता येईल.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.