AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्णव गोस्वामींना मोठा झटका, जवळपास 20 लाखाचा दंड

वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क (Worldview media network limited)ला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी UK मधील रिपब्लिक भारतची जबाबदारी सांभाळते.

अर्णव गोस्वामींना मोठा झटका, जवळपास 20 लाखाचा दंड
अर्णब गोस्वामी
| Updated on: Dec 23, 2020 | 1:06 PM
Share

मुंबई: रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. गोस्वामी यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी UK मधील कम्युनिकेशन नियामक कार्यालय (UK’s broadcasting regulator)कडून 20 हजार पौंड म्हणजे जवळपास 19 लाख 73 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. (Arnav Goswami’s Republic Bharat News Channel fined Rs 20 lakh)

वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क (Worldview media network limited)ला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी UK मधील रिपब्लिक भारतची जबाबदारी सांभाळते. 6 डिसेंबर रोजी रिपब्लिक भारतच्या ‘पूंछता है भारत’ हा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांबद्दल द्वेषयुक्त आणि भडकवणाऱ्या भाषेचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवत वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्कला दंड ठोठावण्यात आला आहे.

द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा

कम्युनीकेशन नियामक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘ऑफकॉम’कडून चॅनेलला स्पष्टीकरण देण्याचे आणि पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत. अर्वण गोस्वामी यांनी आपल्या चर्चासत्रात भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेबाबत घेतलेल्या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची तुलना केली होती. तसंच पाकिस्तानकडून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचाही त्यात उल्लेख होता, अशी माहितीही ‘ऑफकॉम’ने दिली आहे.

अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या चर्चासत्रात स्वत: गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांनी केलेली वक्तव्य आणि वापरलेली भाषा ही पाकिस्तानी लोकांविरुद्ध द्वेष निर्माण करणारी होती. त्यात सातत्यानं पाकिस्तानी नागरिकांचा दहशतवादी, माकड, भिकारी, चोर असा करण्यात आल्याचंही ‘ऑफकॉन’ने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

Arnab Goswami Arrest | अर्णव गोस्वामी यांना अटक झाली तो क्षण, घरात नेमकं काय घडलं?

Arnav Goswami’s Republic Bharat News Channel fined Rs 20 lakh

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.