नरेंद्र मोदी भित्रे पंतप्रधान…सुटका झाल्यानंतर आशुतोष रांका सरकारवर भडकले, नेमकं काय म्हणाले?

पोलिसांच्या तावडीतून .सुटका झाल्यानंतर आशुतोष रांका यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी रांका यांनी मोदी सरकारवर टीका केली.

नरेंद्र मोदी भित्रे पंतप्रधान...सुटका झाल्यानंतर आशुतोष रांका सरकारवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
ashutosh ranka
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 3:02 PM

निवडणूक आयोग आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांची कार्यकारी दंडधिकाऱ्यासमोर हजर केल्यानंतर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके हे आजीच्या निधनामुळे कुटुंबाच्या भेटीसाठी हिंगोलीला गेले. तर आशुतोष रांका, सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकावर हल्लाबोल केला. आशुतोष रांका यांनी नरेंद्र मोदी यांना भित्रा पंतप्रधानमंत्री म्हणत टीका केली.

आशुतोष रांका यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा पतंप्रधानमंत्री भारतात आतापर्यंत पाहिला नाही. मागील दोन दिवसांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताची बदनामी झाली आहे. याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मागील 72 तासांत हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. जे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. त्यांना मारहाण करण्यात आली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी परिस्थिती बिघडून टाकली आहे. आम्हाला विमानातून किडनॅप केलं. नरेंद्र मोदी देशातील सर्वात महान पंतप्रधान होऊ पाहत आहेत’.

Loading...

‘आम्ही आणीबाणीविषयी ऐकलं होतं. आमच्या आई-वडिलांकडून आणीबाणीची कहाणी ऐकली होती. मागील 72 तासांत त्या परिस्थितीवरून भयंकर परिणाम दिसले. 1975 साली ट्रेन बंद करण्यात आले नव्हते. काल अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. लाखोंच्या संख्येने लोकांना त्रास देण्यात आला. निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लढाई होती. ती लढाई नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे वळवून घेतली आहे. नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं की, ते ज्ञानेश कुमार यांना वाचवणार आहेत. त्यांनी हे स्पष्ट केलं की, राजाचा जीव पोपटात आहे. आयोगाची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची असते. परंतु त्यांनी मोदींसाठी काम केलं. भाजपला जिंकवण्यासाठी ते काम करत आहेत, असे ते पुढे म्हणाले.

‘ज्ञानेश कमार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भाजपला जिंकनवण्यासाठी ते काम करत आहेत. काल विमानात शिरून किडनॅप करण्यात आलं. काल दिपकेंच्या आजीचं निधन झालं. पोलिसांकडून त्याला सांगण्यात आलं, त्यावेळी त्यांनी अमानवी, लाजीरवाणा कृत्य केलं. दिपके यांना आजीच्या निधनाविषयी सांगण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांच्या हातात कॅमेरा होता. दिपके वारंवार सांगत होते की, माझे कुटुंबातील सदस्य पटकन घाबरून जातात. त्यांना हृदयरोग आहे. मला माझ्या चुलत्यांशी बोलायचं आहे. परंतु पोलिसांनी त्याला बोलू दिलं नाही. अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. कोणाच्या घरातलं गेल्यानंतर अमानवी वर्तवणूक करत आहेत. दिपके गावी गेले आहेत. परंतु ही लढाई ही सुरू झाली आहे. भारतात युद्धासारखं वातावरण करण्यात निर्माण करण्यात आलं आहे, असा आरोप रांका यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us