AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंवर धर्म संकट? एकीकडे सरकारशी लढाई, दुसरीकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अखेर निर्णय घेतला

अभिजीत दिपकेंवर मोठं धर्म संकट निर्माण झालं आहे. एकीकडे सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे आजीच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यादरम्यान दिपकेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंवर धर्म संकट? एकीकडे सरकारशी लढाई, दुसरीकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर; अखेर निर्णय घेतला
abhijeet dipke Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 2:02 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीजेपीने आंदोलनाची हाक दिल्यानंतर हजारो कार्यकर्ते दिल्लीच्या मार्गावर होते. या आंदोलनाआधी दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिल्लीत येण्याआधी अनेकांना ताब्यात घेतलं. तर काहींना पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतलं. दिपके, सौरव आणि रांका यांना देखील विमानातून ताब्यात घेण्यात आलं . या आंदोलनाच्या दिवशीच अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. आजीच्या निधनाने दिपके कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु ताब्यात घेतल्य्यानंतर दिपकेंची आज सुटका झाली. त्यामुळे आज रविवारी पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपकेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानातून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेऊन तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. पोलिसांनी जवळपास 24 तास ताब्यात घेतल्यानंतर आज रविवारी कार्यकारी दंडधिकाऱ्यासमोर हजर केलं. त्यानंतर त्यांना आज अटी शर्तीवर जामीन मंजूर झाला. तिघांची हमीपत्रावर सुटका करण्यात आली. या हमीपत्राच्या माध्यमातून एक वर्ष शांतता भंग न करण्याची अट घालण्यात आली. तिघे जण कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यात काल दिपकेंच्या आजीचं निधन झालं होतं. त्यांच्या आजीवर आज रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंक्काराला दिपके हे हिंगोलीला जाणार असण्याची शक्यता होती. परंतु वेळेअभावी दिपकेंना जाता आलं नाही. परंतु आता सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अभिजीत दिपके हे गावी हिंगोलीला निघाले आहेत.

अभिजीत दिपके हे हिंगोलीत त्यांच्या गावी जाणार आहेत. ते आजीचे निधन झाल्याने या दुःखाच्या वेळी कुटुंबियांसोबत थांबणार आहेत. दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सौरव दास आणि आशुतोष रांका हे पत्रकार परिषद घेणार आहेत. अभिजीत दिपकेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, आजीचं निधन झाल्याने या दु:खाच्या क्षणी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी माझ्या गावी परत जात आहे. सौरव आणि आशुतोष रांका हे दिल्लीत पत्रकार परिषद घेतील. सीजेपी माघार घेणार नाही. तसेच कोणत्याही दबाव आणि धमक्यांना घाबरणार नाही. खरंतर 10 ऑक्टोबरचा दिवस हा हुकूमशाहीच्या अंताला सुरुवात झाली, म्हणून इतिहासात नोंदवला जाईल’.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका