CJP Jantar Mantar Protest Delhi: अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची हमीपत्रावरच सुटका, पहिली मोठी अट काय?
Abhijit Dipke Ashutosh Ranka and Saurav Das released: कॉकरोच जनता पार्टीचे तीन प्रमुख नेते अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची हमीपत्रावर सुटका झाल्याचे समोर आले आहे. त्यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. आज दुपारी तीनही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

Abhijit Dipke Ashutosh Ranka and Saurav Das released: कॉकरोच जनता पक्षाचे तीन प्रमुख नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सुटका केली. त्यांना जामीन अर्ज मंजूर केला. अटी आणि शर्तींवर त्यांची सुटका झाली. त्यातील सर्वात मोठी अट समोर आली आहे. आज रविवारी दुपारी तीनही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते याविषयीची भूमिका मांडतील.
हमीपत्रावर तीनही नेत्यांची सुटका
10 ऑक्टोबर रोजी या तीनही नेत्यांना आंदोलनापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आज सकाळी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी अटी आणि शर्तींवर त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले.
सर्वात मोठी अट काय?
या तीनही नेत्यांना एक वर्ष शांतता भंग न करण्याची अट घालण्यात आली आहे. त्या शर्तींवर त्यांना सोडण्यात आले आहे. याविषयीचे हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात आले आहे. दरम्यान तीनही नेते पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनांच्या काचा लावलेल्या होत्या.
दुपारी 2 वाजता संयुक्त पत्रकार परिषद
त्यानंतर या नेत्यांना वसंत विहार पोलीस स्टेशनकडे नेण्यात आले. याठिकाणी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. अभिजीत दिपके यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण सौरव दास यांनी दुपारी तीनही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत आम्ही भूमिका मांडू असे सौरव दास यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत ते आंदोलनाची पुढील दिशा आणि त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या तीनही नेत्यांनी 10 ऑक्टोबर रोजीच्या आंदोलनाची हाक दिली होती. काल त्यांना पोलिसांनी सकाळीच आंदोलनापूर्वी ताब्यात घेतले होते.
