AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharti Achrekar : मोठा कलाकार, पण मोठेपणाचा आव…नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या भारती आचरेकर?

Bharti Achrekar On Nana Patekar : भारती आचरेकर यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी शेअर केल्या असून सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

Bharti Achrekar : मोठा कलाकार, पण मोठेपणाचा आव...नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या भारती आचरेकर?
| Updated on: Oct 11, 2026 | 4:12 PM
Share

हिंदी आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनावर कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच आता ज्येष्ठ मराठी अभिनेत्री भारती आचरेकर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

भारती आचरेकर यांची पोस्ट

भारती आचरेकर यांनी पोस्ट करत लिहिलं की, ‘प्रिय नाना, अठ्ठेचाळीस वर्षांची आपली मैत्री. आणि आज तुझ्याबद्दल लिहिताना शब्दच सापडत नाहीत. तुझ्याशी इतकं बोलायचं आहे…पण तू ऐकायला नाहीस, हे मनाला पटतच नाही. तुझ्याबरोबर 2 नाटकं केली पण आधी माझ्या नवऱ्याचा मित्र झालास. मग कधी माझाही इतका जवळचा झालास, कळलंच नाही. घरी येऊन तासनतास त्याच्याशी गप्पा मारणारा तू…आज त्या आठवणींतून उठून पुन्हा दारात यावंसं वाटतं. लोकांनी तुझा रागीट नाना पाहिला. मी तुझ्यातलं लहान मूल पाहिलं. तुझं निर्मळ मन पाहिलं. एवढा मोठा कलाकार, पण मोठेपणाचा आव कधीच नाही. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुणाला संकोच वाटावा, असं अंतर तू कधी ठेवलंच नाहीस.’

‘You gave so much of yourself to others, quietly and selflessly. You never turned someone else’s need into a spotlight for yourself. You simply showed up, gave your time, and helped. तुझ्यासाठी समोरचा माणूस हा आधी माणूस होता. त्याचं नाव, त्याची ओळख, त्याचं स्थान… हे सगळं नंतर. तुझ्या कलेचा आदर जगाने केला. पण माझ्यासाठी तुझ्यातली माणुसकी सगळ्यांत मोठी होती. तिच्यापुढे बाकी सगळं लहान वाटतं. या गणपतीला अचानक तुला फोन केला आणि म्हटलं, “मी येते.” आज वाटतं, बरं झालं तो फोन केला. बरं झालं आले. तू स्वतः मला जेवण वाढलंस. इतक्या वर्षांच्या आपलेपणाने.’

‘I am so grateful I met you. And I ache because I cannot see you again. आणखी थोडा वेळ बसले असते. आणखी थोड्या गप्पा मारल्या असत्या. निघताना तुला आणखी एकदा मिठी मारली असती. नाना, अठ्ठेचाळीस वर्षांचा सहवास काही ओळींत कसा मावेल? किती आठवणी सांगू? आणि प्रत्येक आठवणीनंतर तुझी उणीव कशी सहन करू? तुझी आठवण आली की, फोन उचलण्याची सवय इतक्या सहज जाणार नाही रे. आज फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं…तू होतास, म्हणून आयुष्यात खूप माया होती. तू होतास, म्हणून आधार होता. आणि तू होतास, म्हणून माणुसकीवरचा विश्वास कायम होता. तुझ्यासारखा मित्र मिळाला, हे माझं भाग्य. तुला निरोप द्यावा लागतोय, हे माझं दुःख. खूप वणवण केलीस, आता आराम कर..खूप प्रेम,अणि thank you. तुझी भारती.’ असं भारती यांनी शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु