AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : 24 कॅरेट सोनं चांगलंच वधारलं! 9 दिवसात आणखी उंच उडी, आजचा नेमका भाव काय?

गुरुवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी 4 डिसेंबर रोजी एक्स्पायर होणाऱ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 1,51,503 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

Gold Rate Today : 24 कॅरेट सोनं चांगलंच वधारलं! 9 दिवसात आणखी उंच उडी, आजचा नेमका भाव काय?
gold rate todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 4:09 PM
Share

Toda Gold Rate : भारतात दागिने आणि सोन्याला वेगळं महत्त्व आहे. महिलांचे तर दागिन्यांवर खूपच प्रेम असते. घरात दागिने असतील तर तुम्हाला आर्थिक स्थैर्यही मिळू शकते. म्हणूनच सोने या धातूची किंमत भारतात खूप जास्त आहे. विशेष म्हणजे सोनं कितीही महागलं तरीही लोक या धातूची खरेदी करतातच. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचा भाव सातत्याने वाढताना दिसतोय. ज्या लोकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोनं खरेदी केलेलं आहे, आज ते मालामाल झालेले आहेत. सोन्याचा भाव लक्षणीयरित्या वाढताना दिसतोय. दरम्यान, आता सोन्याचा भाव नेमका काय आहे? ते जाणून घेऊ या…

एमसीएक्सवर सोन्याचा भाव नेमका किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्याचा भाव वाढला आहे. एमसीएक्सवर शेवटचा ड्रेड गुरुवारी झाला होता. कारण शुक्रवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती असल्याने बाजार बंद होता. गुरुवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी 4 डिसेंबर रोजी एक्स्पायर होणाऱ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 1,51,503 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

सोन्याचा भाव किती वाढला?

देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचा भाव वाढताना दिसला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशनच्या संकेतस्थळावर (IBJA.Com) दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ऑक्टोबर रोजी 1,48,138 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. त्यानंतर आता हाच भाव शुक्रवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी 1,49,430 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत वाढला. म्हणजेच सोन्याच्या भावात नऊ दिसांत वाढ झाली आहे.

चांदीचा विचार करायचा झाल्यास एमसीएक्सवर 1 ऑक्टोबर रोजी 4 डिसेंबरला एक्सापायर होणाऱ्या चांदीचा भाव 2,25,877 रुपये प्रती किलोवर होता. शुक्रवारी हाच भाव 2,25,820 रुपये प्रती किलोपर्यंत वाढला. ही वाढ मोठी नसली तरीही चांदीचा भाव वाढत असल्याचे समोर आले.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु