AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता तर कुठे आमची..

आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. अभिजीत दिपके यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी काही वेळानंतर यांना सोडून दिले. त्यानंतर आता रांका यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

कॉकरोच जनता पार्टीचे भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना थेट मोठे आव्हान, आता तर कुठे आमची..
Cockroach Janata Party
| Updated on: Sep 28, 2026 | 9:57 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या काही सदस्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसली. अभिजीत दिपके यांनीही मोठे विधान केले. आता सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आव्हान दिले आहे. CJP साठी ही केवळ सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या बैठकीसाठी रांका रविवारी गुवाहाटी येथे पोहोचले होते. रांका यांनी बैठक घेण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अगोदर त्यांना रोखले आणि त्यानंतर ताब्यात घेतले. काही वेळात पोलिसांनी त्यांना सोडूनही दिले. मात्र, यानंतर वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. रांकाने पोलिसांनी सोडून दिल्यानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

रांकाने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, हिमंत बिस्वा सरमा, आसाममधील कॉकरोच जनता पार्टीला आता कुठेतरी सुरूवात झाली. या पोस्टमध्ये रांका यांनी एक फोटोही शेअर केला. ज्यात हॉटेलमध्ये हे लोक जेवताना दिसत आहेत. पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन सोडून दिले. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. यासोबतच काल पोलिस ठाण्यातील आंदोलनात मी देखील तुमच्यासोबत सहभागी होणार होतो.

एका नियोजित बैठकीपूर्वीच पोलिसांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुंकी चाैधरी यांच्या निवासस्थानावरून 40 हून अधिक सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील काहिलिपारा भागातील आसाम पोलिसांच्या 10 व्या बटालियनच्या मुख्यालयात नेण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळाल्याने एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या शाळेचा मुद्दा उपस्थित करताना सीजेपी दिसत आहे. राजस्थानच्या शाळेत स्थिती नक्की काय आहे हे दाखवताना सीजेपी दिसत आहे. रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीची आक्रमक भूमिका बघायला मिळाली. अभिजीत दिपकेही आरोप करताना दिसले. आसाममध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यातच भाजपाच्या बालेकिल्ल्यात जाऊन सीजेपी बैठकी घेताना दिसत आहे. त्यातच कार्यकर्त्यांसह रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Follow Us
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?