AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस कर्मचारी चक्कर येऊन पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावले मदतीला, थेट..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायमच गरज पडेल तिथे मदतीला धावतात. नुकताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांना स्वत: वाचवले.

पोलिस कर्मचारी चक्कर येऊन पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावले मदतीला, थेट..
Eknath Shinde
| Updated on: Sep 25, 2026 | 7:32 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिस सकाळपासूनच कर्तव्य बजावत होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते. सकाळी ठाण्यातील टेंभी नाका येथील आई दुर्गेश्वरीचे मंडप पूजन करून उपमुख्यमंत्री शिंदे हे पुण्याला अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. त्यानुसार ठाण्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे हे साकेत हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरद्वारे पुण्याला रवाना झाले. अवघ्या काही तासात नानांकडे जाऊन पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा ठाण्यातील त्याच हेलिपॅडवर लँड होत असताना त्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत असलेले संजय नलावडे हे अचानक चक्कर येऊन कोसळले.

आपल्या समोरच पोलीस कोसळल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरून थेट त्यांच्याकडे धावत गेले. तोपर्यंत इतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेत आणून ठेवले होते. शिंदे यांनी तत्काळ ही रुग्णवाहिका ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः ही रुग्णवाहिका पुढे ठेवत आपल्या ताफ्यातून ती ज्युपिटर रुग्णालयापर्यंत घेऊन गेले.

यानंतर त्यांनी नलावडे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टराना सांगितले. स्वतः उपमुख्यमंत्री पोलिसाला घेऊन रुग्णालयात घेऊन आल्याचे कळताच उपायुक्त प्रशांत कदम आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट हे देखील तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात आले. तोपर्यंत नलावडे यांच्यावर डॉक्टरांनी पुढील उपचार सुरू केले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नलावडे यांच्यावर लागतील ते सर्व उपचार करा आणि खर्चाची काळजी करू नका असेही रुग्णालय प्रशासनाला सांगितले.

दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे नंतर आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी मुंबईकडे रवाना झाले .नलावडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षक विजय सांगाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मात्र तरीही सांगाडे यांचा जीव वाचू शकला नाही.

Follow Us
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार