दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाममध्ये ध्वजारोहन, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतही मोठ्या थाटात आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक गुरू परम पूज्य महंत स्वामी महाराज यांनी नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन जनतेला केले.

दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाममध्ये ध्वजारोहन, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!
delhi akshardham
| Updated on: Aug 15, 2025 | 8:03 PM

आज भारतभरात 69 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशातील सर्वच शासकीय कार्यालयांवर आज तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारताला मिळालेले हे स्वातंत्र्य अमूल्य आहे. या स्वातंत्र्याचा सन्मान करूया तसेच भारताच्या विकासासाठी योगदान देऊयात असं संकल्प अनेकांनी केला. नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतही मोठ्या थाटात आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक गुरू परम पूज्य महंत स्वामी महाराज यांनी नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन जनतेला केले.

नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या स्वामीनारायण अक्षरधाम येथे 69 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अक्षरधाममध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमानंतर स्वामी महाराज यांच्याद्वारे प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे सांगितले. ‘खूप संघर्षानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. शास्त्रीजी महाराजांच्या आज्ञेनंतर योगीजी महाराजांनाही 17 वर्षांपर्यंत रोज जप केलेला आहे. अशा अनेक महाराजांचाही भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आशीर्वाद लाभलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन हा आनंदाचा दिवस मानला जातो. आज दिवस हा सर्वच भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी मोठा संघर्ष केलेला आहे,’ असे यावेळी महंत स्वामी महाराज म्हणाले.

तसेच त्यामुळे या स्वातंत्र्याचा मान राखून आपण आपली सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. माझा देश मला काय देऊ शकतो याचा विचार करण्याऐवजी मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. असाच दृष्टीकोन प्रत्येकाने ठेवला तर भारत देशाची झपाट्याने प्रगती होईल. सर्वात अगोदर आपण राष्ट्र प्रथम असा विचार करून आचरण केले पाहिजे. तसेच कोणताही स्वार्थ न ठेवता एकता, सौहार्दाची भावना ठेवून आपण काम करायला हवे, अशाही भावना यावेळी महंत स्वामी महाराज यांनी व्यक्त केल्या.

तसेच त्यांनी निस्वार्थ भाव ठेवून काम करण्याची शक्ती सर्वांना मिळो. देश वेगवेगळ्या मार्गांनी समृद्ध होऊ देत, अशी प्रार्थनाही यावेळी त्यांनी केली.