AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Express : वंदेभारत एक्सप्रेसचा सरासरी वेग कमी झाला, आरटीआयमधून झाला खुलासा

वंदेभारत ही आधुनिक आणि वेगवान ट्रेन मानली जाते. या ट्रेनला प्रवाशांची वाढती मागणी आहे. ही ट्रेन वेगवान असून तिला स्वतंत्र इंजिन जोडण्याची गरज नसल्याने तिचा वेग हाच युएसपी असल्याचे म्हटले जात होते. परंतू प्रत्यक्षात या ट्रेन कमी वेगाने चालविल्या जात असल्याचे उघड झाले आहे.

Vande Bharat Express : वंदेभारत एक्सप्रेसचा सरासरी वेग कमी झाला, आरटीआयमधून झाला खुलासा
Vande Bharat TrainsImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 08, 2024 | 6:01 PM
Share

देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून जिचा गवगवा केला जातो, ती वंदेभारत एक्सप्रेस सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. देशातील अनेक शहरात 100 वंदेभारत एक्सप्रेस सध्या धावत आहेत. या ट्रेन आरामदायी आणि वेगवान आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळात बचत होत आहे. शिवाय या ट्रेन वीजेवर धावत असून त्यांना स्वतंत्रपणे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. या वंदेभारतच्या आता पर्यंतच्या सर्व वंदेभारत एक्सप्रेस या दरताशी 160 ते 180 किमी वेगाने धावत असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रेन बहुतांशी पर्यटन तसेच धार्मिक पर्यटना मार्गावर चालविण्यात येत आहेत. परंतू वेग हाच या ट्रेनचा युएसपी असताना आता ही ट्रेन वेगाच्या बाबतीत जरा धीमी झाल्याचे उघडकीस आले आहे.

वंदेभारत एक्सप्रेसच्या वेगाबाबतीत एक नवीनच माहीती समोर आली आहे. वंदेभारत एक्सप्रेसचा सरासरी वेग 2020-21 मध्ये प्रति तास 84.48 किमी होता.साल 2023-24 वंदेभारतचा सरासरी वेग कमी होऊन प्रति तास 76.25 किमी वेगाने ती सध्या धावत आहे अशी माहीती रेल्वे प्रशासनाने आरटीआयमध्ये दिले आहे. वंदेभारत बरोबर अन्य ट्रेनच्या वेगावर देखील परिणाम झाला आहे. ज्या ट्रेनच्या मार्गांदरम्यान पायाभूत कामे सुरु आहेत. अशा ट्रेनच्या वेगावर देखील परिणाम सुरु झाला आहे.काही ठिकाणी भौगोलिक कारणांनी तसेच वातावरणाचाही गाड्यांच्या वेगावर परिणाम झाला आहे.

आरटीआय अर्जाद्वारे खुलासा

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेसचे उदाहरण यासाठी देण्यात आले आहे. कोकणातील मार्ग हा घाटातून जात आहे. या परिसर संवेदनशील आहे. येथे ट्रेनच्या वेगाबरोबर सुरक्षेसाठी कमी वेगाने गाड्या चालवाव्या लागतात असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. विशेषत: मान्सूनमध्ये येथे खूपच काळजी घ्यावी लागते. यावेळी वंदेभारतच्या वेग प्रति तास 75 किमी इतकी ठेवावी लागते. मध्य प्रदेशातील चंद्र शेखर गौड नावाच्या व्यक्तीने आरटीआय अर्जाद्वार वंदेभारत ट्रेनच्या वेगाची माहीती मागितली होती.

वंदेभारचा स्लीपर कोच कधी योणार ?

सध्या वंदेभारत एक्सप्रेस या चेअरकार स्वरुपाच्या असून आता वंदेभारतचा स्लिपर कोच तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या वंदेभारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटो टाईप लवकरच प्रवाशांच्या भेटीला येत आहे. नवी दिल्ली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदेभारत चालविण्याची योजना आहे. बंगलोरची बीईएमल ( BEML Limited ) आधीची भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited )  कंपनी वंदेभारत स्लिपर कोच तयार करीत आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का