बाबा रामदेव घेऊन आले आयुर्वेदिक हुक्का! योग गुरुने सांगितले फायदे, व्हिडीओ व्हायरल

बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका महिलेला आयुर्वेदिक हुक्का देताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया नेमकी काय भनगड आहे...

बाबा रामदेव घेऊन आले आयुर्वेदिक हुक्का! योग गुरुने सांगितले फायदे, व्हिडीओ व्हायरल
baba Ramdev
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 8:08 AM

आजकाल ई-सिगारेट आणि फ्लेवर्ड हुक्का तरुणांमध्ये खूप चर्चेच विषय ठरत आहे. मात्र, आरोग्य तज्ञ यांना आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सांगतात. ई-सिगारेट आणि फ्लेवर्ड हुक्का सेवन केल्याने फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते, तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही वाढू शकतो. याच दरम्यान बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते आयुर्वेदिक हुक्क्याबद्दल बोलताना दिसत आहेत. रामदेव बाबा व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत की हा हुक्का तुमच्या आरोग्यासाठी चांगला ठरू शकतो. चला जाणून घेऊया याबद्दल…

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वामी रामदेव एका महिलेच्या हातात हुक्का देताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये स्वामी रामदेव हुक्का पिण्यास सांगताना म्हणत आहेत की, “या स्वामी रामदेवने नवीन हुक्का बार सुरू केला, पाहा हे इकडून जळत आहे, हे काय आहे हे नाकातून बाहेर येत आहे संपूर्ण, धूर बाहेर येत आहे. यात अनेक जडीबुट्या आहेत.”

या गोष्टी लागतील

आयुर्वेदिक हुक्का बनवण्यासाठी रामदेव बाबा एक चिमुट ज्येष्ठमध, एक चिमूट हळद, एक चिमूट मोहरी, थोडे गायीचे तूप, काकडा सिंगी आणि देशी कपूर यांसारख्या गोष्टी वापरण्याचा सल्ला देतात.

देशी हुक्का कसा तयार कराल?

बाबा रामदेव म्हणतात, आयुर्वेदिक हुक्का बनवण्यासाठी ज्येष्ठमध थोडे कुटून त्यात गायीचे तूप मिसळावे. यानंतर त्यात एक चिमूट हळद आणि मोहरी टाकावी. आता हुक्क्याच्या प्लेटवर कापूर टाकून पेटवावा. शेवटी त्यावर काकडा सिंगी टाकावी.

बाबा रामदेव सांगतात, या सर्व गोष्टी हुक्क्याद्वारे घेतल्याने बंद नाक उघडण्यास आणि खोकला कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच वात-पित्त-कफ त्रिदोषांतही आराम मिळू शकतो. बाबा रामदेव म्हणतात, ई-सिगारेट आणि फ्लेवर्ड हुक्क्यात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल्स आणि तंबाखू आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us