
Baba Vanga Predictions 2026: पुढील वर्षाकरीता बाबा वेंगा हिने अनेक धक्कादायक भाकीतं केली आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI चा दबदबा राहणार आहे. तर एलियंन्स हे पृथ्वीवर मानवी थेट संपर्क साधणार असल्याचे म्हटले आहे. तर एकामागून एक नैसर्गिक संकट मानव जातीवर येणार असल्याचा दावा या भविष्यवाणीत करण्यात आला आहे. बाबा वेंगा ही बुल्गारियाची रहिवासी होती. तिचा जन्म 1911 साली झाला होता. तर वयाच्या 84 व्या वर्षी 1996 मध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. बाबा वेंगा लहान असतानाच तिची दृष्टी गेली. पण तिला भविष्यातील अनेक गोष्टी विस्मयकारक शक्तीमुळे दिसू लागल्या. त्यावेळी तिला काही गोष्टींची, नवीन तंत्रज्ञानाची नावं माहिती नव्हती. पण तिने त्याला सांकेतिक भाषेत नावं दिलीत. तिच्या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. तिने वर्ष 5079 पर्यंत भाकीतं केल्याचे सांगण्यात येते.
बाबा वेंगाच्या अनुयायानुसार, अमेरिकेवरील 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, 2004 मधील त्सुनामी आणि ओबामा हे राष्ट्राध्यक्ष होणार ही भाकीतं तिनं अगोदरच केलेली होती. तर पुढील वर्षात 2026 मध्ये एक मोठे युद्ध सुरु होणार असल्याचा तिचा दावा आहे. या संघर्षात युरोप ते आशियाला मोठा फटका बसणार असल्याचे तिचे भाकीत आहे. यामध्ये अनेक देशांच्या सीमा बदलण्याचा दावा करण्यात आला आहे.
Aliens ची एंट्री
पुढील वर्षी, 2026 मधील नोव्हेंबर महिन्यात मानव पहिल्यांदा इतर ग्रहांवरील जीवांशी संपर्क साधेल असा दावा या भाकीतात करण्यात आला आहे. तर एका मोठ्या दाव्यानुसार, खास अंतराळ यानातून एलियन्स पृथ्वीवर येतील. ते मानवाशी थेट संपर्क साधतील. यापूर्वी बाबा वेंगाने एक मोठे भाकीत केले होते. त्यानुसार, एलियन्स हे पृथ्वीच्या सौरमंडळातून जातील आणि पृथ्वीसह इतर ग्रहांवरील हालचाली टिपतील.
या वर्षी जुलै महिन्यात चिलीमध्ये 3I/ATLAS नावाची एक घाडमोड अंतराळातून टिपण्यात आली होती. हे रहस्यमय ऑब्जेक्ट ‘ओमुआमुआ’ पेक्षा अनेक पटीने मोठे आहे. हे जवळपास 2 लाख 10 हजार किलोमीटर ताशी वेगाने आपल्या सूर्यमालेतून गेले. अनेक वैज्ञानिकांनी दुर्बिणीतून हे चित्र रेकॉर्ड केले. अनेकांच्या मते हे एलियन्सचे शटल होते. धुमकेतू हे सूर्याच्या उलट दिशेतून येतात. पण हे रहस्यमयी गोष्ट थेट सूर्याच्या अगदी जवळून गेल्याने त्याविषयी विज्ञान जगतात मोठी खळबळ उडालेली आहे.
सूचना : शास्त्रज्ञ बाबा वेंगाची भाकीतं मानत नाहीत. हे सर्व दावे खोटे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाबा वेंगा हिची भाकीतं ही काव्यात्म आहे आणि ती फारशी लिखित नाहीत. विशेष म्हणजे ती एखाद्या प्रदेशाचं, देशाचं नाव घेऊन केलेली नाही तर या काळात अशा घटना घडू शकतात असा तिचा दावा आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणी तशी घटना जुळून येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ तिच्या भविष्यवाणीकडे लक्ष देत नाहीत.