अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंस, 27 वर्षांनी अंतिम निकालाची तारीख ठरली

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंसाप्रकरणी सीबीआयचं (CBI) विशेष न्यायालय येत्या 30 सप्टेंबरला निकाल देणार आहे.(Babari Masjid demolition final Verdict)

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंस, 27 वर्षांनी अंतिम निकालाची तारीख ठरली

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विद्ध्वंसाप्रकरणी सीबीआयचं (CBI) विशेष न्यायालय येत्या 30 सप्टेंबरला निकाल देणार आहे. सीबीआय विशेष न्यायालयातील अयोध्या प्रकरणाचे न्यायमूर्ती सुरेंद्र यादव यांच्यामार्फत हा निकाल जाहीर केला जाईल. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंसप्रकरणी तब्बल 27 वर्षांनी कोर्टाचा निर्णय येणार आहे. (Babari Masjid demolition final Verdict)

सीबीआयच्या आरोपपत्रात 49 जणांची नावं आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंभरा, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती आणि विनय कटियार यांचा समावेश आहे. 49 आरोपींपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 आरोपींच्या भविष्याचा फैसला येत्या 30 सप्टेंबरला होणार आहे.

कोर्टाचा निर्णय महिनाभर पुढे
अयोध्या वादग्रस्त वास्तू विद्ध्वंसप्रकरणात, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपल्यानंतर, विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी 2 सप्टेंबरला निकाल लिहण्यास प्रारंभ केला जाईल, असं म्हटलं होतं. सीबीआयने आरोपींविरोधात 351 पुरावे आणि 600 दस्तऐवज सादर केले आहेत. त्यामुळे आता सीबीआय कोर्टाला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक महिन्याच्या आत आपला निर्णय द्यावा लागणार आहे.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष न्यायालय 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने ती महिनाभर पुढे ढकलण्याची वेळ आली.

(Babari Masjid demolition final Verdict)

संबंधित बातम्या   

बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालंय, बाबरी खटला बेकायदेशीर, अडवाणींना साक्षीला बोलावणे विसंगत : संजय राऊत

Ayodhya Ram Mandir | बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *