दिवसाची कमाई 3 हजार, दोन बायका, भिकाऱ्याचं रंगेल आयुष्य, पण एक मोठी समस्या म्हणून…

भिकाऱ्याची दिवसाची कमाई 3 हजार रुपये, 2 बायकांसोबत जगतोय रंगेल आयुष्य... तरीही भिकाऱ्याचं एकाच घरात राहणं झालंय कठीण... भिाकाऱ्याची समस्या जाणून तुम्हीली व्हाल हैराण...

दिवसाची कमाई 3 हजार, दोन बायका, भिकाऱ्याचं रंगेल आयुष्य, पण एक मोठी समस्या म्हणून...
| Updated on: Jul 30, 2025 | 12:42 PM

भिकारी आहे… असं समजून आपण 5 – 10 रुपये भीक म्हणून देतो. पण 5 – 10 अनेकांकडून घेत भिकारी दिवसाला मोठी कमाई करातात. आकड्यावर तुम्हा विश्वास देखील बसणार नाही. सध्या ज्या भिकाऱ्याची चर्ची रंगली आहे, त्या भिकाऱ्याची दिवसाची तीन हजार रुपये कमाई आहे… हे जाणून तुम्ही देखील हैराण झाले असणार, एवढंच नाही तर, या भिकाऱ्याच्या दोन बायका आहे आणि दोघींसोबत राहण्यासाठी त्याली कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथे एक जनसुनावणी सुरू होती. कलेक्टरसह सर्व उच्च अधिकारी तिथे उपस्थित होते. तेवढ्यात एक भिकारी तिथे पोहोचला. त्याने स्वतःच्या दोन पत्नींबद्दल अशी तक्रार केली की तिथे उपस्थित असलेले सर्व लोक स्तब्ध झाले.

अपंग भिकारी शफीक शेखने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की त्याला दोन बायका आहेत. त्या दोघीही एकमेकांशी खूप भांडतात, त्यामुळे त्याच्या भीक मागण्याच्या कामावर परिणाम होत आहे. भिकारी म्हणाला, ‘दोघींची प्रचंड भांडणं होतात. पण मला दोघींसोबत एका छताखाली रहायचं आहे.’

शफीककडून हे ऐकून जिल्हाधिकारी ऋषभ कुमार गुप्ता यांना धक्का बसला. एवढंच नाही तर जनसुनावणीला बसलेले इतर विभागांचे अधिकारीही स्तब्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी भिकाऱ्याची तक्रार महिला आणि बालविकास विभागाकडे चौकशीसाठी पाठवली आहे. आता शफीक याच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दोन वर्षात दोन लग्न…

तक्रार घेऊन आलेल्या शफीकने सांगितले की, त्याला दोन बायका आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव शबाना आणि दुसऱ्या पत्नीचे नाव फरीदा आहे. त्याने 2022 मध्ये शबाना आणि 2024 मध्ये फरीदाशी लग्न केलं. शफीक अंध आहे आणि तो खंडवा आणि महाराष्ट्र दरम्यान धावणाऱ्या ट्रेन आणि बसमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो.

कलेक्टर साहेब कृपया बायकांना समजावून सांगा… असं देखील भिकारी म्हणाला. भिकारी शफीक याच्या दिवसाची कमाई 2 – 3 हजार रुपये आहे. पण दोन्ही बायका प्रचंड भांडत असतात. त्यामुळे भीक मागणं देखील कठीण झालं आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि दोन्ही पत्नींना समजवावी…. अशी विनंती भिकाऱ्याने केली. सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा रंगली आहे.