Bharat Bandh 2025 : भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बिहार, पश्चिम बंगाल आणि… कुठे कुठे दिसतोय प्रभाव ?

आज (९ जुलै), बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, महामार्ग, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रात काम करणारे २५ कोटींहून अधिक कर्मचारी देशभरात सर्वसाधारण संपावर गेले आहेत. सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी युनिट्सच्या व्यासपीठाने हा संप पुकारला आहे. संपाला कुठे कसा प्रतिसाद मिळाला आहे, कशी परिस्थिती आहे, जाणून घेऊया.

Bharat Bandh 2025 : भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बिहार, पश्चिम बंगाल आणि... कुठे कुठे दिसतोय प्रभाव ?
भारत बंदची हाक
Image Credit source: social media
| Updated on: Jul 09, 2025 | 10:18 AM

देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून ते कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करत आहेत. आज देशभरात भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने या संपाची हाक दिली आहे. शेतकरी संघटना आणि ग्रामीण कामगार संघटनांनीही याला पाठिंबा दिला आहे.

या संपामुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, राज्य वाहतूक, औद्योगिक उत्पादन, वीजपुरवठा आणि इतर अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहतील. या सार्वजनिक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. तथापि, या ‘भारत बंद’चा लोकांच्या दैनंदिन कामावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असे अनेक व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

कुठे दिसतोय भारत बंदचा परिणाम ?

भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. तथापि, मतदार यादी सुधारणेच्या विरोधातही बिहारमध्ये संप सुरू आहे. तेथे गाड्या थांबवल्या जात आहेत. यासोबतच, लोक टायर जाळत असल्याचे चित्रही समोर येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पाटण्याला रवाना झाले आहेत. भारत बंदचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. हाजीपूर, अररिया, दानापूर येथे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

हेल्मेट घालून बस ड्रायव्हर चालवत आहेत बस

तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येही भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. कोलकात्यातही भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जाधवपूर ८बी बसस्थानकाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बसचालक सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालून बस चालवत आहेत. कोलकातामध्ये भारत बंद असूनही, जाधवपूरमध्ये खाजगी आणि सरकारी बसेस धावत आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी, बस चालक हेल्मेट घालून बस चालवत आहेत.

 

संपामध्ये सहभागी असलेल्या प्रमुख संघटना

– ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस (AITUC)

-इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन कांग्रेस (INTUC)

-सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (CITU)

-हिंद मजदूर सभा (HMS)

-सेल्फ-एम्प्लॉईड वूमन्स एसोसिएशन (SEWA)

-लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन (LPF)

– यूनाइटेड ट्रेड यूनियन कांग्रेस (UTUC)

आंदोलनाचे कारण काय ?

सरकारने लागू केलेली चार नवीन कामगार संहिता हे या संपाचे मुख्य कारण आहे. या नियमांमुळे संप करणे कठीण होते, कामाचे तास वाढतात, कंपनी मालकांना शिक्षेपासून संरक्षण मिळते, नोकरीची सुरक्षा आणि योग्य वेतन धोक्यात येते असा कामगार संघटनांचा आरोप आहे. खाजगीकरण आणि कंत्राटी कामगारांच्या वाढत्या भूमिकेलाही विरोध आहे. यापूर्वी 2020, 2022 आणि 2024 सालू देखील अशाच प्रकारचे देशव्यापी संप झाले होते, ज्यात लाखो कामगार कामगार समर्थक धोरणांची मागणी करत रस्त्यावर उतरले होते.