‘भारत इनोव्हेट्स इन्व्हेस्टर शोकेस’चे बंगळुरू येथे आयोजन, २४ डीप-टेक स्टार्ट-अप्सचे सादरीकरण

कार्यक्रमाचा समारोप स्टार्ट-अप्स संस्थापक आणि गुंतवणूकदारांमधील विस्तृत नेटवर्किंग आणि वैयक्तिक चर्चासत्रांनी झाला. अनेक गुंतवणूकदारांनी आगामी आठवड्यांत पुढील चर्चेसाठी उत्सुकता व्यक्त केली.

भारत इनोव्हेट्स इन्व्हेस्टर शोकेसचे बंगळुरू येथे आयोजन, २४ डीप-टेक स्टार्ट-अप्सचे सादरीकरण
Bharat Innovates Investor Showcase
| Updated on: May 22, 2026 | 5:18 PM

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आणि इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशन (IVCA) यांच्या सहकार्याने, १९ मे २०२६ रोजी बंगळुरूमध्ये ‘भारत इनोव्हेट्स इन्व्हेस्टर शोकेस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शोकेसमध्ये ‘भारत इनोव्हेट्स’ अंतर्गत निवडलेल्या २४ उच्च-क्षमता असलेल्या भारतीय डीप-टेक स्टार्ट-अप्सनी सहभाग घेतला होता. या स्टार्ट-अप्सची निवड आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या समितीने केली होती. या कार्यक्रमात भारतातील अनेक प्रतिष्ठित गुंतवणूकदार सहभागी झाले, ज्यामुळे फ्रान्समधील नीस येथे होणाऱ्या ‘भारत इनोव्हेट्स 2026’ या प्रमुख कार्यक्रमाच्या तयारीला मोठी चालना मिळाली आहे.

‘भारत इनोव्हेट्स’ हा पंतप्रधान मोदी यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाच्या उद्घाटनावेळी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत जाहीर केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या संयुक्त सचिव सौम्या गुप्ता यांनी उद्घाटनप्रसंगीस सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, बंगळुरूतील या शोकेसने भारतातील डीप-टेक उद्योजकांना दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि जागतिक स्तरावर विस्तारासाठी आवश्यक भागीदारांशी थेट संवाद साधण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर Accel चे भागीदार प्रशांत प्रकाश, Peak XV चे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन आणि Avendus चे सह-संस्थापक आणि CEO गौरव दीपक, जे ‘भारत इनोव्हेट्स 2026’ च्या कोअर एडव्हायजरी कमिटीचे सदस्य आहेत, यांनी भारतातील संशोधनाधारित डीप-टेक स्टार्ट-अप्सना जागतिक गुंतवणूक प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणण्याच्या या उपक्रमाच्या धोरणात्मक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.

येथे पोस्ट पाहा –

या २४ स्टार्ट-अप्सनी अंतराळ आणि प्रक्षेपण प्रणाली, इलेक्ट्रिक विमानचालन आणि एरोस्पेस, संरक्षण आणि प्रोपल्शन, सेमिकंडक्टर्स आणि 5G/6G, क्वांटम कॉम्प्युटिंग, न्यूरो-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि सेल थेरपी, पुनरुत्पादक औषधशास्त्र, महिला आरोग्य, कृषी-जैवतंत्रज्ञान आणि अचूक शेती, प्रगत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, जल व सागरी रोबोटिक्स आणि डिजिटल आरोग्य अशा विविध अत्याधुनिक क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. प्रत्येक संस्थापकाने १० मिनिटांचे सादरीकरण आणि त्यानंतर ५ मिनिटांची गुंतवणूकदारांसोबत चर्चा अशा संरचित पद्धतीने आपले प्रकल्प मांडले.

बंगळुरूमधील हा शोकेस ‘भारत इनोव्हेट्स 2026’ च्या पूर्वतयारीसाठी शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक आहे. १४ ते १६ जून २०२६ दरम्यान फ्रान्समधील नीस येथे होणाऱ्या या प्रमुख कार्यक्रमात सुमारे १२० संशोधनाधारित भारतीय डीप-टेक स्टार्ट-अप्स जागतिक उद्योग नेते, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान भागीदारांसमोर आपले नाविन्य उपक्रम सादर करतील.

‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये प्रगत संगणन, सेमिकंडक्टर्स, पुढील पिढीतील संप्रेषण, प्रगत साहित्य आणि महत्त्वपूर्ण खनिजे, जैवतंत्रज्ञान, अंतराळ, संरक्षण आणि उत्पादन आणि इंडस्ट्री 4.0 यांसह १३ अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतातील नवोन्मेषक, संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योग यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणे आणि भारतीय डीप-टेक स्टार्ट-अप्ससाठी फ्रान्स, युरोप आणि जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेशाचे नवीन मार्ग खुले करणे हा आहे.

९० हून अधिक गुंतवणूकदारांचा सहभाग

दिवसभर चाललेल्या या शोकेसमध्ये ९० हून अधिक गुंतवणूकदार उपस्थित होते, ज्यांच्या व्यवस्थापनाखाली जागतिक स्तरावर एकूण ८५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. यामध्ये Peak XV Partners, Accel, Bessemer Venture Partners, Bertelsmann India Investments, Avaana Capital, Blume Ventures, Kalaari Capital, Chiratae Ventures, 360 ONE Asset, Avendus Capital, B Capital, Aavishkaar Capital, Sony Innovation Fund आणि Omnivore यांसारख्या नामांकित संस्थांचा समावेश होता.

Follow Us