‘ब्यूटी क्वीन’ ते परराष्ट्र मंत्री! BRICS परिषदेत जिच्या सौंदर्याची चर्चा, ती बियांका ओजुकू कोण?

दिल्लीतील ब्रिक्स परिषदेत नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्री बियांका ओजुकू यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या अप्रतिम सौंदर्य, फॅशन सेन्स आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मिस इंटरकॉन्टिनेंटल ते परराष्ट्र मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वकील आणि राजकीय नेत्या म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला आहे.

‘ब्यूटी क्वीन’ ते परराष्ट्र मंत्री! BRICS परिषदेत जिच्या सौंदर्याची चर्चा, ती बियांका ओजुकू कोण?
Bianca Ojukwu
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 5:50 PM

दिल्लीत अखेर ब्रिक्स परिषदेचं सूप वाजलं आहे. अर्ध्या जगातील बलाढ्य नेते या परिषदेला उपस्थित राहिले होते. देश विदेशातील राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री या परिषदेला उपस्थित होते. सोमवारी हे नेते मायदेशी परतले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर मात्र यापैकी एका नेत्याने सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं. तो चेहरा म्हणजे नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्री बियांका ओडूमेग्वु ओजुकू. स्मित हास्य, ग्रेसफूल चेहरा आणि अप्रतिम सौंदर्य यामुळे बियांका या भारतीय मीडिया आणि सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्या. त्यामुळे बियांका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळेच ब्यूटी क्वीन ते परराष्ट्र मंत्रीपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या बियांका कोण आहेत? याचाच घेतलेला हा मागोवा.

दिल्लीत शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ब्रिक्स परिषदेला जगभरातील नेते आले होते. या परिषदेत गंभीर राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी बियांका यांनी आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अद्भूत व्यक्तिमत्त्व, फॅशनचा कमालीचा सेन्स आणि सौंदर्याची जादू यामुळे त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. सोमवारी त्या जेव्हा आपल्या देशात नायजेरियाला जायला निघाल्या तेव्हा विमानतळावर त्यांचा फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यांचा किलकिलाट झाला. हे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर आले आणि त्यांच्या सौंदर्याची सर्वच तारिफ करू लागले. किलर हास्य आणि शाही स्टाईल यामुळे बियांका यांची थेट मोनालिसासोबत तुलना करण्यात येऊ लागलीय.

कोण आहेत बियांका?

बियांका ओडुमेग्वु-ओजुकू केवळ नायजेरियाच्या बड्या राजकारणी नाहीत तर त्यांचा भूतकाळ अत्यंत प्रेरणादायक आणि ग्लॅमरस राहिला आहे. बियांका पूर्व मिस अंतरमहाद्वीपीय (Miss Intercontinental) होत्या. राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय ब्यूटी क्वीन म्हणून लौकीक मिळवला होता. त्यांना 1988 मध्ये मोस्ट ब्यूटीफुल गर्ल इन नाइजीरिया आणि त्यानंतर अफ्रीकी महाद्वीपाचा लौकिक वाढवल्याबद्दल प्रतिष्ठित मिस इंटरकॉन्टिनेंटल पुरस्कार देऊन गौरवलं आहे.

सौंदर्य, वकील आणि राजकारणी…

बियांका केवळ सुंदरच नाही, तर त्या बौद्धिक दृष्ट्याही समृद्ध आहेत. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. त्या नायजेरियाच्या नामांकित वकील होत्या. त्या नायजेरियाचे माजी उपराष्ट्रपती आणि नायजेरियाई राज्याच्या माजी राज्यपाल सी. क्रिश्चियन ओनु यांच्या कन्या आहेत. बियांका यांचा विवाह नायजेरियाचे ऐतिहासिक आणि महान जननायक चुक्वुएमेका ओडुमेग्वु-ओजुकु यांच्याशी झाला होता.

यापूर्वी बियांका यांनी स्पेनमध्ये नायजेरियाच्या राजदूत म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर देशात परराष्ट्र व्यवहारातील राज्यमंत्री आणि नंतर परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. नायजेरिया आणि संपूर्ण आफ्रिका बेटावर त्यांना एक स्टाइल आयकॉन आणि प्रभावशाली महिला म्हणून पाहिलं जातं.

महिलांमध्ये क्रेझ

ब्यूटी स्पर्धेत सर्वोच्च स्थान, त्यानंतर नामांकित वकील म्हणून मिळवलेला लौकिक आणि आता थेट परराष्ट्र मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बियांका यांची महिलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आपल्या बौद्धिकतेच्या जोरावर त्यांनी हे सर्व काही मिळवलं आहे. त्यामुळेच आफ्रिकेतील महिला त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. बियांका यांची स्टाईल फॉलो करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us