AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्र उलटं फिरलं… बालेकिल्ल्यातच लागली वाट, भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; धक्कादायक निकाल

राजस्थान भाजपचा बालेकिल्ला असूनही परबतसर पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. वॉर्ड 13 मधील भाजप उमेदवार कैलास चंद्र यांना केवळ एकच मत मिळालं. विशेष म्हणजे, त्यांना स्वतःचे मतही मिळाले नाही. वॉर्ड 20 मधील RLP उमेदवारालाही एकच मत मिळालं. या अनपेक्षित निकालाने उमेदवार निवड आणि पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चक्र उलटं फिरलं... बालेकिल्ल्यातच लागली वाट, भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; धक्कादायक निकाल
BJP's Rajasthan Local Elections Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 5:13 PM
Share

राजस्थान हा भाजपचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच भाजपला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. डीडवाना-कुचामन जिल्ह्यातील परबतसर नगर पालिका निवडणुकीचा एक निकाल समोर आला आहे. हा निकाल देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या दोन वॉर्डामध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या उमेदवाराला प्रत्येकी फक्त एकच मत मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार कैलाश चंद्र ज्या वॉर्डातून निवडणूक लढत होते, तिथे त्यांना स्वत:चं मतही मिळालेलं नाहीये. त्यामुळे या धक्कादायक निकालावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राजस्थानच्या पालिका निवडणुकीत परबतसर महापालिकेतील निकाल सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर अधिक चर्चेत आहे. वॉर्ड नंबर 13 मधून भाजपचे उमेदवार कैलाश चंद्र यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर वॉर्ड नंबर 20 मधून राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी RLP चे उमेदवार भंवरलाल यांनाही केवळ एकच मत मिळालं आहे. निकाल लागताच सर्वाधिक चर्चा भाजपचे उमेदवार कैलाश चंद्र यांची होत आहे. कैलाश चंद्र यांना केवळ एकच मत कसं काय मिळालं? या वॉर्डातून त्यांनी निवडणूक का लढवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

स्वत:चं मतही मिळालं नाही

कैलाश चंद्र वॉर्ड नंबर 12 मधील मतदार आहेत. तर भाजपने त्यांना वॉर्ड नंबर 13 मधून उमेदवारी दिली होती. भाजपला या वॉर्डातून उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे कैलाश चंद्र यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी या वॉर्डातून अर्ज भरला होता. त्यांनी निवडणुकीचा प्रचारही जोरदार केला होता. त्यांच्या प्रचारसभांना, रॅलीला प्रचंड गर्दीही जमत होती. त्यामुळे या वॉर्डात अटीतटीचा सामना होईल, असा कयास वर्तवला जात होता. कैलाश चंद्र यांनीही निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण निकाल येताच त्यांना धक्का बसला. केवळ एक मत मिळाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या वॉर्डातून काँग्रेसच्या हिना खानम यांना 376 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार रसीद खान यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. रसीद खान यांना 195 मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे कैलाश चंद्र या मतदारसंघातील मतदार नसल्याने त्यांना स्वत:लाही मतदान करता आलं नाही. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वॉर्ड नंबर 12मध्ये मतदान केलं. या ठिकाणी भाजपचा दुसरा उमेदवार उभा होता.

केवळ लढायचं म्हणून…

वॉर्ड नंबर 13 मध्ये भाजपला उमेदवार मिळत नव्हता. त्यावरून या वॉर्डात भाजपची काय स्थिती होती, हे स्पष्ट होतं. या वॉर्डातून कोणीही भाजपमधून लढायला तयार नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून जाऊ नये म्हणून कैलाश चंद्र यांना बाहेरून आणून त्यांना या मतदारसंघातून लढायला भाग पाडण्यात आलं. पक्षाचा आदेश म्हणून कैलाश चंद्रही तयार झाले. पण निकालाने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

भंवरलाल तो गय्यो…

परबतसर नगर पालिकेच्या वॉर्ड नंबर 20 चे आरएलपीचे उमेदवार भंवरलाल यांनाही केवळ एकच मत मिळालं आहे. या वॉर्डातील निकालानेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महापालिकेत आरएलपीचं चांगलं वर्चस्व राहिलं आहे. त्यांचे उमेदवार निवडूनही आलेले आहेत. असं असताना एका उमेदवाराला एकच मत मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अन् चर्चा सुरू

परबतसर नगर पालिका निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी केवळ एकच मत मिळाल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या उमेदवार निवडीवर आणि संघटनेच्या बांधणीवरही सवाल केले जात आहेत. एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या या वॉर्डातील कार्यकारिणीची मते कुठे गेली? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

Follow Us
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन