मध्य पूर्वेतून मोठी बातमी; इराणची मित्र भारतासाठी सर्वात मोठी घोषणा, देशावरचं मोठं संकट टळलं

मोठी बातमी समोर येत आहे, इराणने मोठी घोषणा केली आहे, इराणच्या नव्या निर्णयामुळे आता भारताला मोठा फायदा होणार आहे. इराणे पुन्हा एकदा आपली मैत्री जपली आहे. यामुळे आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मध्य पूर्वेतून मोठी बातमी; इराणची मित्र भारतासाठी सर्वात मोठी घोषणा, देशावरचं मोठं संकट टळलं
mojtaba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 10:10 PM

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र युद्ध सुरू असतानाच इराणने मोठी खेळी केली. इराणने वाहतुकीसाठी होर्मूज सामुद्रधुनी बंद केली. यामुळे अनेक कच्च्या तेलाची वाहतूक करणारी जहाज अडकून पडली. परिणामी जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. याच एक महत्त्वाचं कारण म्हणजे जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्यानं संपूर्ण जगात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे.

भारताला दिलासा देणारी बाब म्हणजे इराणने भारताची दोन जहाज यापूर्वीच या मार्गातून सोडली होती. त्यामुळे भारताचा इंधन टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणने आपल्या मित्र देशांसाठी पुन्हा एकदा होर्मूजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी सुरू केली आहे. होर्मूज स्ट्रेट इराणने वाहतुकीसाठी ओपन केल्यानं आता पूर्वी पेक्षा या मार्गाने जाणाऱ्या जहाजांची संख्या वाढली आहे. शिप ट्रॅकिंग टेडामधून ही माहिती समोर आली आहे. इराणकडून आता अनेक व्यावसायिक जहाजांना या मार्गाने जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी इराणने हा मार्ग सर्वच देशांसाठी बंद केला होता, मात्र आता हा मार्ग आपल्या मित्र देशांसाठी सुरू करण्याचा निर्णय इराणने घेतला आहे, त्यामुळे या देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.

कोणत्या देशांना प्रवेश?

आपल्या मित्र देशांसाठी इराणने पुन्हा एकदा होर्मूजची सामुद्रधुनी सुरू केली आहे. यामध्ये चीन, भारत आणि इराणच्या इतर मित्र राष्ट्रांचा समावेश आहे. मात्र ही सामुद्रधुनी पाश्चिमेकडील देश आणि अमेरिका तसेच इस्त्रायलच्या समर्थक आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या देशांसाठी बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान इराणच्या या निर्णयामुळे भारताला आता मोठा फायदा होणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us