टॅरिफनंतर ट्रम्प यांना मोठा धक्का, भारतासाठी आली गुडन्यूज, या क्षेत्रात झाला जबरदस्त फायदा

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, आजपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेमध्ये 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे. त्यापूर्वीच भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

टॅरिफनंतर ट्रम्प यांना मोठा धक्का, भारतासाठी आली गुडन्यूज, या क्षेत्रात झाला जबरदस्त फायदा
| Updated on: Aug 27, 2025 | 6:02 PM

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, आजपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेमध्ये 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी अशी काही आकडेवारी समोर आली होती, जिच्या माध्यमातून असा दावा करण्यात येत होता की, टॅरिफच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थोडा-फार भारतावर परिणाम होऊ शकतो. मात्र जेवढा अंदाज लावला जात आहे, त्याच्या एक टक्के सुद्धा अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताचं नुकसान होणार नसल्याचं आता समोर आलं आहे. अमेरिकेला भारताच्या डेअरी आणि कृषी क्षेत्रात एन्ट्री करायची होती, मात्र भारतानं ट्रम्प यांना यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी दबाव निर्माण करण्यासाठी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

मात्र भारतानं अमेरिकेला डेअरी आणि कृषी क्षेत्रात एन्ट्री न मिळू देण्याचा जो निर्णय घेतला होता, तो योग्य असल्याचं आता आकडेवारीवरून आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवरून समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते टॅरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला थोडं-फार नुकसान होऊ शकतं, मात्र भारताच्या या निर्णयामुळे देशातील सर्वात मोठं डेअरी सेक्टर सुरक्षित राहणार आहे. या सेक्टरमधून दहा कोटी लोकांना थेट रोजगार मिळतो.

तज्ज्ञांच्या मते जर भारतानं अमेरिकेला डेअरी क्षेत्रात एन्ट्री दिली असतील तर फार मोठा तोटा सहन करावा लागला असता, याचा थेट परिणाम हा लाखो लोकांच्या रोजगारावर झाला असता, दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले असते, त्या तुलनेत टॅरिफमुळे भारताचं जे नुकसान होणार आहे, ते यापुढे काहीच नाहीये. कारण भारतातील डेअरी सेक्टर हे जवळपास बारा लाख कोटी रुपयांचं आहे, ज्यामधून दहा कोटी लोकांना थेट रोजगार मिळतो.

दरम्यान भारत दर वर्षी जवळपास 38,35,000 कोटी रुपयांच्या सामानाची निर्यात करतो, यापैकी आपण अमेरिकेला जवळपास 7,65,000 कोटी रुपयांचं सामान निर्यात करतो, म्हणजे जवळपास आपण अमेरिकेला एकूण सामानापैकी तीस टक्के सामान निर्यात करतो, जरी या निर्यातीला फटका बसला तरी देखील आपल्यासाठी रशिया आणि चीनची बाजारपेठ नव्यानं ओपन होऊ शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.