AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, आता द्यावा लागणार तब्बल एवढा टॅरिफ, अमेरिकेतून मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच टॅरिफ संदर्भात इशारा दिला होता. त्यानंतर आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये टॅरिफ बिलाला मंजुरी मिळाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, आता द्यावा लागणार तब्बल एवढा टॅरिफ, अमेरिकेतून मोठी बातमी
Donald Trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 6:55 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच टॅरिफ संदर्भात इशारा दिला होता. जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्या देशांवर आपण टॅरिफ लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अखेर या बिलाला अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता भारतासोबतच आणखी चार देशांच्या अडचणी वाढणार आहेत. अमेरिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. टॅरिफ बिलाला अमेरिकेच्या संसदेमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता भारतासह चीन, हंगेरी, अजरबैजान आणि स्लोवाकिया या देशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हे बिल अमेरिकेच्या संसदेमध्ये मंजूर झालं आहे. त्यानंतर आता हे बिल मंजुरीसाठी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेटेटिव्हकडे जाणार आहे. इथे हे बिल मंजूर होताच भारतासह पाच देशांवर त्यानंतर शंभर टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.

रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या पाच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून पुढाकार घेण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे युद्ध ते थांबवू शकले नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले. ते एवढ्यावच थांबले नाहीत तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर आम्ही 100 टक्के टॅरिफ लावू अशी धमकी देखील त्यांनी दिली होती.

भारत, चीन सारखे मोठे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात. यातून मिळणारा पैसा रशिया हा युक्रेनविरोधात युद्धासाठी वापरत आहे,  असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. त्यानंतर रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. आता अमेरिकेनं तसा कायदाच केला आहे. या बिलाला अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी मिळाली आहे. आता हे बिल मंजुरीसाठी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेटेटिव्हकडे जाणार आहे, तिथे मंजुरी मिळताच रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग मोकळा होणार आहे. याचा भारताला मोठा फटका बसू शकतो.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ