पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला मोठा घात, थेट शत्रू देशासोबत मिळून…, मोठी खळबळ

रशिया हे भारताचं मित्र राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी भारताचा दौरा देखील केला होता, मात्र आता अशी माहिती समोर आली आहे, ज्या बातमीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला मोठा घात, थेट शत्रू देशासोबत मिळून..., मोठी खळबळ
Vladimir Putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 01, 2026 | 10:09 PM

रशिया भारताचा मित्र देश म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. तसेच भारताला आपण कधीही कच्चं तेल कमी पडू देणार नाही, अशी घोषणा देखील त्यावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी केली होती. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. एका गोपनीय रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार रशियाच्या सैन्याने गेल्या वर्षी चीनमध्ये गुप्त ट्रेनिंग घेतली होती. या ट्रेनिंगला रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे सर्वात जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे आणि सध्या संरक्षण मंत्री असलेले आंद्रे बेलौसोव यांनी व्यक्तिगतरित्या परवानगी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. या ट्रेनिंगमध्ये रशिया आणि चीनचे चार जनरल देखील सहभागी झाले होते अशी माहिती समोर येत आहे. चीन सैन्याच्या देखरेखीखाली रशियाच्या सैन्यांना रेडिओलॉजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल हल्ल्यांपासून स्वत:च संरक्षण कसं करायचं याची ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चीनने हे वृत्त नेहमीप्रमाणे फेटाळून लावलं आहे. मात्र रशियाचं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे आता चीन आणि रशियाची जवळीक वाढल्याची पहायला मिळत आहे.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार या युद्ध ट्रेनिंगमध्ये चीन आणि रशियाचे जनरल स्थरावरील उच्च अधिकारी देखील सहभागी झाल्यामुळे भारताचं तर टेन्शन वाढलंच आहे, परंतु युरोप आणि अमेरिकेचं देखील टेन्शन वाढलं आहे.रशियाच्या एका गोपनीय कागदपत्रामधून ही माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये रशियाच्या सैन्यांना चीनमध्ये ट्रेनिंग दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या सैन्यांना रेडिओलॉजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल हल्ल्यांपासून स्वत:च संरक्षण कसं करायचं याची ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घडामोडींमुळे आता भारताची देखील चिंता वाढली आहे.

भारताची चिंता कशी वाढली?

या ट्रेनिंगमुळे चीन आणि रशियामधील जवळीकता अधिक वाढली आहे, दोन्ही देशांमधील सैन्य संबंध अधिक मजबूत झाले आहेत. याचा थेट धक्का भारताला बसू शकतो. कारण चीन हे भारताचं शत्रू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. अनेकदा भारत आणि चीनमध्ये खटके उडत असतात. भारत युद्धासाठी जी सामुग्री वापरतो, त्यातील जवळपास 60 टक्के सामुग्रीची निर्मिती ही रशियामध्ये होते, त्यामुळे त्याबाबत चीनी सैन्यदलाला गोपनीय माहिती मिळू शकतो, हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, समजा भविष्यात जर भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर रशियामधून भारताला होणारा शस्त्रपुरवठा देखील प्रभावीत होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us