14 ऑक्टोबरला राजकारणात मोठा भूंकप, आणखी एका पक्षाला सर्वात मोठा झटका, आमदार करणार भाजपात प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून आमदार, खासदार आणि नेत्यांचं पक्षांतर सुरूच आहे. इंडिया आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे.

लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकांनंतर इंडिया आघाडीमधून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा मोठा पराभव झाला, तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात मोठी फूट पडली. तब्बल वीस खासदारांनी तृणमूलची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तसेच 58 आमदारांनी देखील वेगळा गट निर्माण केला. महाराष्ट्रात देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीनंतर आता आणखी एका मोठ्या पक्षात फूट पडली आहे.
समाजवादी पक्षात मोठा धक्का बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच अखिलेश यादव यांना मोठा झटका बसला आहे. सपाच्या तीन बंडखोर आमदारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. 14 ऑक्टोबर रोजी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये अमेठीच्या गौरीगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश प्रताप सिंह, अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभय सिंह आणि जालानच्या कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद चतुर्वेदी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा अखिलेश यादव यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राकेश प्रताप सिंह हे गौरीगंज मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राकेश प्रताप सिंह यांची या मतदारसंघावर मजबूत पकड आहे. ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये राकेश प्रातप सिंह यांनाच या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.