AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का; मित्र पक्षाचे आमदार करणार बंडखोरी, पक्षाध्यक्ष हतबल, राजकारण तापलं

भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मित्र पक्षाचे आमदार बंडखोरी करणार आहे, अशी माहिती खुद्द पक्षाध्यक्षांनीच दिली आहे. जर बंडखोरी झाली तर हा भाजपसाठी मोठा झटका असणार आहे.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का; मित्र पक्षाचे आमदार करणार बंडखोरी, पक्षाध्यक्ष हतबल, राजकारण तापलं
भाजपला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 3:17 PM
Share

उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीची जोरदार तयार सुरू आहे. भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा सर्वच पक्षांकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या मित्र पक्षाचे आमदार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. हे आमदार भाजप उमेदवाराला मतदान न करता समाजीवादी पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. असा दावा खुद्द पक्ष प्रमुखांकडूनच करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी सुभासपाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आपल्या पक्षातील दोन आमदारांबद्दल हा दावा केला आहे.

अब्बास अंसारी आणि जौनपूरच्या जाफराबाद मतदारसंघाचे आमदार जगदीश नारायण राय यांच्याबद्दल ओमप्रकाश राजभर यांनी मोठा दावा केला आहे. अब्बास अंसारी आणि जगदीश नारायण राय हे जरी सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या चिन्हावर निवडून आले असले तरी देखील ते सुरुवातीपासूनच समाजवादी पार्टीसोबत आहेत. ते समाजवादी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह असलेली टोपी घेऊन फिरत असतात. ते समाजवादी पक्षालाच सपोर्ट करतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील ते समाजवादी पक्षालाच मतदान करतील, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एकूण दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यामध्ये चुरस पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचं संख्याबळ पहाता, मित्र पक्षांना सोबत घेऊन भाजप उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या सात जागा सहज जिंकेल असं चित्र आहे. तर समाजवादी पक्ष दोन जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. मात्र दहाव्या जागेसाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. राज्यसभेच्या दहाव्या जागेवर कोणाचा उमेदवार विजयी होणार, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे आमदार बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता मतदानानंतरच हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...