मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप, थलपती विजय यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात, टीव्हीकेला सर्वात मोठा झटका
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेने प्रस्थापित पक्षाला मोठा धक्का देत सत्ता मिळवली. मात्र आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं पहायला मिळत आहे. टीव्हीकेला मोठा झटका बसला आहे.

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेने प्रस्थापित पक्षाला मोठा धक्का देत सत्ता मिळवली. टीव्हीकेनं एडीएआयएमके, डीएमके सारख्या पक्षाचा पराभव केला. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना सर्वाधिक 107 जागा मिळाल्या मात्र तरी देखील टीव्हीके बहुमतापासून दूरच होता. बहुमत मिळवण्यासाठी थलपती विजय यांना तारेवरची कसरत करावी लागली, अखेर थलपती विजय यांना तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला तरी देखील आमदारांचा आकडा बहुमतापासून दूरच होता. त्यानंतर काही छोट्या -मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याने थलपती विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला आणि तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. दोन पक्षांनी थलपती विजय यांची साथ सोडल्यामुळे थलपती विजय यांची खुर्ची धोक्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये 6 ऑक्टोबरला विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे, मात्र त्यापूर्वीच टीव्हीकेला मोठा झटका बसला आहे. सीपीआय आणि सीपीएम या दोन पक्षांनी थलपती विजय यांची साथ सोडली आहे. दरम्यान दोन पक्षांनी अचानक साथ सोडल्यामुळे सत्ताधारी टीव्हीकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार 6 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सीपीआय धारापुरम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहे. तर दुसरीकडे मदुरंतकम विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं सीपीएमने म्हटलं आहे. आम्ही आता इथूनपुढे टीव्हीकेच्या कोणत्याही आघाडीत नसल्याची घोषणा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे.
थलपती विजय यांच्याकडे सध्या काठावरचं बहुमत आहे. डावे पक्ष सत्तेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे धारापुरम आणि मदुरंतकम विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. या दोन मतदारसंघात जर डाव्या पक्षांचा विजय झाला तर थलपती विजय यांचं सरकार संकटात येऊ शकतं. परंतु जर या निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाचा विजय झाला तर मात्र सरकारवरील संकट टळणार आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस टीव्हीके सोबत असल्यामुळे हा एक मोठा आधार असणार आहे.