मोठी बातमी! आणखी एक सरकार अडचणीत, 15 आमदारांची बंडखोरी, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, इंडिया आघाडीला मोठा झटका
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, इंडिया आघाडीने सध्या केंद्रातील एनडीए सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे आता इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे.

एकीकडे इंडिया आघाडीने सध्या केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमधील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली पार पडली. या रॅलीमध्ये काँग्रेससह जवळपास वीस विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. इंडिया आघाडीकडून सातत्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तसेच एसआयआरच्या मुद्द्यावर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमधून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दरम्यान एकीकडे इंडिया आघाडीमधील नेते सरकारविरोधात एकत्र येत असतानाच आता दुसरीकडे मात्र जम्मू -काश्मीरमधील उमर अब्दुल्ला यांचं सरकार मोठ्या संकटात सापडलं आहे. जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे.
जम्मू काश्मीरमधील उमर अब्दुल्ला सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या मंत्रिमंडळात काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले होते. त्यावरून आता 15 आमदार नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. पक्षातील 15 आमदार तसेच एका अपक्ष आमदाराने पक्षनेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळामध्ये झालेल्या फेरबदलावरून या आमदारांनी आता बंडखोरी केली आहे. आमदारांच्या नाराजीमुळे पक्षाध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांचं टेन्शन वाढलं आहे. फारूक अब्दुल्ला यांच्याकडून सातत्याने या आमदारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार पदावरून आधी नासीर असलम यांना हटवा तर चर्चा होईल अशी भूमिका या 16 बंडखोर आमदारांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारामुळेच पक्षाचं नेतृत्व आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये दुरावा वाढत असल्याचा आरोप या आमदारांकडून करण्यात आला आहे. दरम्यान आता हे बंड कशापद्धतीने फारूक अब्दुल्ला थंड करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खासदाराचा राजीनामा
दरम्यान दुसरीकडे उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असलेल्या नॅशनल कॉन्फ्रन्स पार्टीचे श्रीनगरचे खासदार सैयद्द रुहुल्लाह यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. त्यांनी आपण आपल्या लोकसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहोत, अशी घोषणा तीन नोव्हेंबर रोजीच केली होती. समोर आलेल्या माहितीप्रमाणे पक्षासोबत झालेल्या काही मतभेदामुळेच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा उमर अब्दुल्ला सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे.